पीककर्ज वाटपाला मिळेना गती...

राष्ट्रीयीकृत बँकांकडून दहा टक्केच वाटप
Crop Loan News | Pik Karj
Crop Loan News | Pik KarjSakal

नांदेड - जिल्ह्यात खरीप हंगाम २०२२ - २०२३ साठी एक हजार ५१८ कोटी रुपयांचे पिककर्ज वाटपाचे उद्दिष्ट प्रशासनाने बँकांना दिले आहे. असे असताना देखील जिल्ह्यात सर्वाधिक शाखा असलेल्या राष्ट्रीयकृत बँकांनी आजपर्यंत केवळ दहा टक्केच पिक कर्ज वाटप केल्याचे स्पष्ट झाले आहे. केवळ जिल्हा बँकेने सात टक्के व ग्रामिण बँकने ३८ टक्के पिककर्ज वाटप केल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयाकडून मिळाली. (Crop Loan News)

जिल्हास्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी आगामी खरीप हंगामात नांदेड जिल्ह्यासाठी एक हजार ५१८.८० कोटी तर रब्बीसाठी ६२६.६० कोटी असे एकूण दोन हजार १४५ कोटी ४१ लाखांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट २८ बँकांच्या वेगवेगळ्या शाखांना दिले आहे. या बाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी शेतकर्‍यांना वेळेत कर्ज देण्याची सूचना दिली होती. पिककर्ज वेळेवर उपलब्ध व्हावे, यासाठी मंडळनिहाय शिबीरे घेण्याचे नियोजन केले. परंतु अद्याप पिककर्ज वाटपाला गती मिळाली नाही.

राष्ट्रीयकृत बँकांनी ता. ३१ मे पर्यंत जिल्ह्यात आठ हजार ९०६ खातेदारांना ८८ कोटी १२ लाखांचे कर्ज वाटप केले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून तीन हजार ७२९ शेतकऱ्यांना २६ कोटी ११ लाख तर महाराष्ट्र ग्रामिण बँकेने १३ हजार ४५९ शेतकऱ्यांना १०३ कोटी ३३ लाखांचे कर्ज वाटप केले आहे.

जिल्ह्यात १४.३२ टक्क्यांनुसार आजपर्यंत खरिपासाठी एकूण २६ हजार ९४ शेतकऱ्यांना २१७ कोटी ५६ लाख रुपयांचे कर्ज वाटप केल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयाकडून मिळाली. पिककर्ज वाटपात यंदा महाराष्ट्र ग्रामिण बॅंकेने सर्वाधिक पिककर्ज वाटप केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com