esakal | Video-गौराईच्या आगमनापूर्वी बाजारात खरेदीसाठी गर्दी
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded Photo

मंगळवारपासून तीन दिवस हा उत्सव चालणार आहे. सजावट साहित्य, मकर, फळे, फुले, मिठाई, ज्वेलरी, इलेक्ट्रीक बाजार अशा सर्वच ठिकाणी महिलांची खरेदीसाठी सोमवारी गर्दी झाली होती. महालक्ष्मीच्या सुंदरतेमध्ये अधिक भर पडावी यासाठी महिला खरेदी करताना दिसत होत्या.   

Video-गौराईच्या आगमनापूर्वी बाजारात खरेदीसाठी गर्दी

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : श्रीगणेशाच्या अगमनानंतर चौथ्या दिवशी मंगळवारी (ता. २५) तितक्याच थाटात ‘गौरीई’चे आगमन होत आहे. गौरी- गणपती हे कोरोनाच्या संकटात सर्वात आनंददाई सन- उत्सव म्हणून साजरे केले जात आहेत. त्यामुळे मंगळवारी सोनपावलाने येणाऱ्या गौराईच्या स्वागतासाठी कुठलिही कमी राहु नये यासाठी महिलांनी बाजारात खरेदीसाठी सोमवारी गर्दी केली होती.  

सोन्याच्या पावलाने घरी येणाऱ्या महालक्ष्मीचे भाद्रपद महिण्यातील अगमण हे मागल्याचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. मंगळवारपासून तीन दिवस हा उत्सव चालणार आहे. सजावट साहित्य, मकर, फळे, फुले, मिठाई, ज्वेलरी, इलेक्ट्रीक बाजार अशा सर्वच ठिकाणी महिलांची खरेदीसाठी सोमवारी गर्दी झाली होती. महालक्ष्मीच्या सुंदरतेमध्ये अधिक भर पडावी यासाठी महिला खरेदी करताना दिसत होत्या.   

हेही वाचा- जिल्ह्यात खुनाची मालिका सुरुच : नांदेडात खंजरने भोसकुन एकाचा खून

सोमवारी गर्दीने शहरातील बाजारपेठ गजबजून गेली

विविधतेने नटलेल्या भारत देशात दरवर्षी सर्वच सण- उत्सव लहानापासून ज्येष्ठापर्यंत सर्वजण उत्सवात पण तितक्याच तत्पर्तेने योगदान देत असतात. त्यामुळे कुठल्याही सणाला घरात वेगळे चैतन्य निर्माण झाल्याचे दिसते. यावर्षी मात्र कोरोना संसर्गाच्या भितीने प्रत्येकाने स्वतःला घरात कोंडुन घेतले आहे. अनेकजण अत्यावश्‍यक कामाशिवाय घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे यंदा गौरी- गणपती उत्सव साजरा होईल की नाही अशी चिंता महिलांमध्ये पडली होती. मात्र शनिवारी थाटामाटात ‘श्री’चे आगमन होताच महालक्ष्मीच्या आगमनासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी घराबाहेर पडण्याचे धाडस महिलांनी केल्याने सोमवारी गर्दीने शहरातील बाजारपेठ गजबजून गेली होती.  

अनेक दिवसापासून बंद असलेल्या बाजारात खरेदी करण्यासाठी ग्राहकांची वर्दळ वाढल्याने अनेक लहान मोठे दुकानदार, फळ, फुल विक्रेते यांना दिलासा मिळाल्याचे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. सोमवारी शहरातील मुख बाजारपेठ असलेल्या वजिराबाद, जुना मोंढा टॉवर, सराफा बाजार, श्रीनगर, तरोडानाका परिसर गर्दीने फुलला होता.  

हेही वाचा- गंगाखेड शहरातील ‘त्या’ आवाजाचे रहस्य गूढच

महालक्ष्मीचे मुखवटे यांच्या किमतीमध्ये वाढ नाही

कोविडमुळे अनेकांच्या हाताला कामे नाहीत, त्यामुळे अनेकांच्या जगण्या मरण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेकांच्या मनात असताना देखील पैसे नसल्याने त्यांना महालक्ष्मीचा हा सण साजरा करता येत नाही, ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे फळे, भाजीपाल व सोने-चांदीचे दागीने सोडली तर महालक्ष्मीचे मुखवटे यांच्या किमतीमध्ये कुठेही दरवाढ झाली नाही. साडेपाचशे रुपयापासून ते एक हजार २०० रुपयापर्यंत दर आहेत.    

सोने - चांदीचे दर गगनाला भिडल्याने पुन्हा सोन्याची झळाळी देऊन तयार केलेल्या व हुबेहुब सोन्यासारखे दिसणाऱ्या कोल्हापूर दागिण्यांना जास्त मागणी होती. मकर, प्लास्टीकची फुले सजावटीच्या साहित्य खरेदीसाठी ग्राहकांनी दुकानात गर्दी केली होती.