esakal | संचारबंदी म्हणजे संचारबंदीच, उल्लंघन केल्यास...विजयकुमार मगर
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

पोलिस विभागाकडून काटेकोरपणे राबविण्यात येणार आहे. या काळात शहर व जिल्ह्याच्या विविध ठिकाणी कडक नाकाबंदी करण्यात येणार असून नागरिकांनी संचारबंदीचे उल्लंघन करु नये.

संचारबंदी म्हणजे संचारबंदीच, उल्लंघन केल्यास...विजयकुमार मगर

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लाक्षात घेता जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या संचारबंदीचा आदेश पोलिस विभागाकडून काटेकोरपणे राबविण्यात येणार आहे. या काळात शहर व जिल्ह्याच्या विविध ठिकाणी कडक नाकाबंदी करण्यात येणार असून नागरिकांनी संचारबंदीचे उल्लंघन करु नये. अत्यावश्‍यक कामाशिवाय बाहेर पडल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी सांगितले. 

जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असल्याने जिल्हा प्रशासन त्यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रय्तन करीत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांकडून योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्याने ता. १२ जुलै ते २० जुलै दरम्यान पुन्हा जिल्हाधिकारी यांनी संचारबंदी लागू केली आहे. या कालावधीत नागरिकांनी घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे. असा इशारा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी दिला आहे.

हेही वाचा -  महावितरणच्या नांदेड परिमंडळात वृक्षारोपन

जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ

देशात व राज्यासह जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर केले होते. त्याला नंतर शिथिलता देण्यात आली. परंतु त्यानंतर नांदेड जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नका असे आवाहन वारंवार करूनही त्यास प्रतिसाद मिळत नव्हता. दरम्यान नांदेड जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत गेली. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी संचारबंदीचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत पोलीस प्रशासनाला दखल घ्यावी लागणार आहे.  संचारबंदी लक्षात घेता त्याची कडक अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज असल्याची माहिती पोलिस अधीक्षक श्री मगर यांनी दिली आहे.

येथे क्लिक कराराज्यात प्रथमच : नांदेडात आता ‘मिशन पॉझिटिव्ह सोच’

नांदेडकरांनी पोलिस प्रशासनास सहकार्य करावे 

संचारबंदी कालावधीत नियमाचे उल्लंघन होऊ नये यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ४५ फिक्स पॉईंट (त्यात नांदेड शहरात २० तर शहराबाहेर २५) स्थापन करण्यात आले आहेत. जिल्ह्याबाहेर किंवा राज्याबाहेर जाणाऱ्या किंवा येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी राहणार आहे. अत्यावश्‍यक पास असेल तरच सोडण्यात येणार आहे. सिमावर्ती भागात २५ फिक्स पॉईन्ट लावण्यात आले आहेत. तसेच सर्व तालुका ठिकाणी त्या- त्या पोलिस ठाण्याचे कर्मचारी अधिकारी कार्यरत राहणार आहेत. संचारबंदीचे उल्लंघन केल्यास संबंधीतावर कडक कारवाई केल्या जाणार आहे. नांदेडकरांनी पोलिस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही श्री. मगर यांनी केले आहे.  
 

loading image