नांदेड : 'सकाळ'चा उद्या सहावा वर्धापनदिन

'कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव, पानसुपारीचा हॉटेल विसावात कार्यक्रम
नांदेड : 'सकाळ'चा उद्या सहावा वर्धापनदिन

नांदेड : नांदेडकरांच्या मनात अल्पावधीतच आपुलकीचे स्थान असणारा दैनिक ‘सकाळ’ मंगळवारी (ता. एक मार्च) सहाव्या वर्षात पदार्पण करत आहे. यानिमित्ताने नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यातील कर्तृत्ववान व्यक्तींच्या प्रातिनिधिक गौरवासह पानसुपारीच्या कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी (ता. एक मार्च) करण्यात आले आहे. शिवाजीनगर परिसरातील नाना - नानी पार्कजवळील हॉटेल विसावा येथे सायंकाळी पाच ते आठ या वेळेत चहापान कार्यक्रम होईल.

नांदेड, परभणी आणि हिंगोलीकरांची सकाळ ही ‘सकाळ’ वाचून होते. हाच दृढ विश्वास जपत ‘सकाळ’ने गेली पाच वर्षे आपला पत्रकारितेचा वसा जपला आहे. विश्वासार्हता आणि उत्तम दर्जा या जोरावर ‘सकाळ’ची वाटचाल सुरु आहे. ‘सकाळ’ने वाचकांशी आपली बांधिलकी कायम जपली. पत्रकारितेसोबत ‘सकाळ’ने सामाजिक उपक्रमांमध्येही नेहमीच पुढाकार घेतलेला आहे. संकटाच्या काळात नागरिकांच्या हाकेला ‘ओ’ देणारा आणि पीडितांचे संसार उभे करण्यासाठी ‘सकाळ’ नेहमीच अग्रभागी राहिलेला आहे. यापुढेही राहणार आहे.

दैनिक ‘सकाळ’ महाराष्ट्रात यावर्षी आपल्या विश्वासार्ह पत्रकारितेची नव्वदी साजरी करत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही वर्धापनदिनाचा विशेषांक सर्वसामान्य वाचकांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर प्रसिद्ध करणार आहोत. सद्यस्थितीत या परिसरात समृद्धी महामार्गाचा जोडप्रकल्प, बुलेट ट्रेन, राष्ट्रीय महामार्ग, विविध उद्योगधंदे तसेच इतर विकासकामे प्रगतीपथावर आहेत. या सर्व कामांचा वेध ‘विकास गाथा’ या विशेष पुरवणीमधून घेण्याचा प्रयत्न ‘सकाळ’ करत आहे. समाजामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्ती, संस्थांचा प्रातिनिधिक स्वरूपात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि नांदेड वाघाळा महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्या उपस्थितीत गौरव सोहळा होईल. त्यानंतर पानसुपारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पानसुपारी कार्यक्रमास वाचक, वितरक, जाहिरातदार, विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या वतीने करण्यात आले आहे.

असा असेल कार्यक्रम

  • कर्तृत्ववान व्यक्ती, संस्थांचा गौरव ः दुपारी चार ते पाच

  • पान सुपारी कार्यक्रम ः मंगळवारी (ता. एक) सायंकाळी पाच ते रात्री आठ

  • ठिकाण ः हॉटेल विसावा, नाना नानी पार्कजवळ, शिवाजीनगर, नांदेड.

या व्यक्तींचा होणार प्रातिनिधिक स्वरूपात गौरव

  • शिवतेज शिरफुले ः लॉन टेनिस खेळातील नांदेडचा युवा खेळाडू.

  • विजय पांचाळ ः नांदेडच्या ग्रामीण भागातील लघु उद्योजक.

  • अर्जुन जाधव ः नांदेडच्या ग्रामीण भागातील युवा प्रगतीशील शेतकरी.

  • मीरा कदम (हिंगोली) ः अनेक पोरक्या लेकरांच्या डोक्यावरील मायेचे छत्र.

  • लक्ष्मीकांत पिंपळगावकर (परभणी) ः थॅलेसिमियाग्रस्त रुग्णांसाठी आशेचा किरण.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com