esakal | अर्धापुरात पोलिसांची धाडसी कारवाई; कत्तलीसाठी जाणाऱ्या 35 गोवंशाना जीवदान
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

तसेच अवैध वाहतूकीसाठी वापरण्यात येणारा मालवाहू दोन ट्रक जप्त करण्यात आले असून पाच जणांविरुध्द अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अर्धापुरात पोलिसांची धाडसी कारवाई; कत्तलीसाठी जाणाऱ्या 35 गोवंशाना जीवदान

sakal_logo
By
लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : वसमतच्या जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी तर काही कत्तलीसाठी जाणारे 35 बैल (गोवंश) अर्धापूर पोलिसांनी मंगळवारी (ता. दोन ) पहाटे जप्त केली. तसेच अवैध वाहतूकीसाठी वापरण्यात येणारा मालवाहू दोन ट्रक जप्त करण्यात आले असून पाच जणांविरुध्द अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या धाडसी कारवाईबद्दल अर्धापूर पोलिसांचे कौतुक होत आहे.

या बाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, अर्धापूर- वसमतफाटा मार्गावरील सांगवी खडकी पाटीजवळ मालवाहतूक करणारा ट्रक (एम. एच 31 सी.क्यु 7175)  व (एम एच 40 ए.के 76 74 ) तपासणी केली असता गोवंश जातीचे 35 जनावरे आढळून आली. ही जणावरे ताब्यात घेण्यात आली. या गोवंशाची किंमत सुमारे सात लाख आहे. तसेच 25 लाखांचे मालवाहक दोन ट्रक जप्त करण्यात आले आहेत.

या प्रकरणी हवालदार सतीश लहानकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन राजीक हुसैन कासमी हुसैन ( वय 28) रा. बुरशीपुरा, कळम, सादिर अहेमद कुरेशी समद कुरेशी (वय 39) रा. कळम, जुलफीकार अहमद कुरेशी (वय 33) रा. कळंब (जिल्हा उस्मानाबाद ), महंमद इस्साक महंमद हानीफ (वय 35) रा. कळम, अब्दुल सादिक अब्दुल सत्तार रा. कळम यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक साईनाथ सुरवसे हे करीत आहेत. तालुक्यातून अवैध गौवंशाची वाहतूक हा नेहमीचा प्रकार असून ता पुर्वी ही आवैध गौवंशाची वाहतूक कारणारे वाहणे जप्त करून गौवंशाची मुक्तता करण्यात आली होती. त्यानंतर ही धाडसी कार्यवाही करण्यात आली आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image