नांदेड जिल्ह्यात एक हजार १९२ कोटींची कर्जमाफी
राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत दोन लाखांपर्यंत कर्जमाफी करण्याची घोषणा केली होती. यात शासनाच्या निकषानुसार राज्यात जिल्हानिहाय शेतकऱ्यांच्या थकीत खाते कर्जमुक्तीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यानुसार टप्याटप्याने निधीचे वाटप करण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यात एक हजार १९२ कोटी ६० लाख रुपयांची कर्जमाफी झाली आहे.
नांदेड - महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत नांदेड जिल्ह्यात दोन लाख १४ हजार ४९१ खाते कर्जमुक्तीसाठी पात्र ठरले आहेत. यातील दोन लाख १२ हजार ७५९ खात्यांचे आधारलिंक झाले आहेत. त्यातील एक लाख ७३ हजार ९०५ शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीचे एक हजार १९२ कोटी ६० लाख रुपये जमा झाले आहेत. मात्र, असे असले तरी अजूनही जिल्ह्यातील ४० हजार ५८६ शेतकऱ्यांना अद्याप कर्जमुक्तीची प्रतीक्षा आहे.
राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत दोन लाखांपर्यंत कर्जमाफी करण्याची घोषणा केली होती. यात शासनाच्या निकषानुसार राज्यात जिल्हानिहाय शेतकऱ्यांच्या थकीत खाते कर्जमुक्तीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यानुसार टप्याटप्याने निधीचे वाटप करण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यात एक हजार १९२ कोटी ६० लाख रुपयांची कर्जमाफी झाली आहे.
हेही वाचा - दिवाळी विशेष : शेतकरी गटाची झेंडू उत्पादनात भरारी, दसरा, दिवाळीत मिळाला बाजारभाव
कर्जमुक्तीसाठी एक हजार ४६१ कोटी लागणार
नांदेड जिल्ह्यातील २३ बॅंकांच्या वेगवेगळ्या शाखेतील आतापर्यंत दोन लाख १४ हजार ४९१ शेतकऱ्यांची थकीत खाते कर्जमुक्तीसाठी पात्र ठरली आहेत. या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक हजार ४६१ कोटी लागणार आहेत. यातील दोन लाख १२ हजार ७५९ खात्यांचे आधारलिंक झाले आहेत. पोर्टलवर अपलोड झालेल्या दोन लाख आठ हजार ७९६ खात्यांपैकी एक लाख ८३ हजार २८० खाते पोर्टलवर प्रसिद्ध झाले आहेत. यातील एक लाख ७३ हजार ९०५ शेतकऱ्यांच्या खात्यावर एक हजार १९२ कोटी ६० लाख रुपये जमा झाल्याची माहिती मिळाली.
अद्याप ४० हजार ५८६ कर्जखाते माफीच्या प्रतिक्षेत
नांदेड जिल्ह्यात आत्तापर्यंत दोन लाख १४ हजार ४९१ शेतकऱ्यांची थकीत खाते कर्जमुक्तीसाठी पात्र ठरली आहेत. मात्र, अद्याप ४० हजार ५८६ कर्जखाते माफीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे त्यांची कर्जमाफी कधी होणार? याकडेही लक्ष लागले आहे. दरम्यान, उर्वरित शेतकऱ्यांची माहिती बँकांद्वारे अपलोड करण्याचे कामकाज चालू आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयाकडून देण्यात आली.