esakal | देगलूरच्या जुगार अड्ड्यावर कारवाई, तेरा जुगारी अटक
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

झन्ना- मन्ना नावाच्या जुगारावर पोलिसानी छापा टाकला. यावेळी १३ जुगाऱ्यांना अटक करून त्यांच्याकडून ११ हजार ९५० रुपयाचा ऐवज जप्त केला.

देगलूरच्या जुगार अड्ड्यावर कारवाई, तेरा जुगारी अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : लॉकडाउनचे नियम पायदळी तुडवीत सुरू असलेल्या झन्ना- मन्ना नावाच्या जुगारावर पोलिसानी छापा टाकला. यावेळी १३ जुगाऱ्यांना अटक करून त्यांच्याकडून ११ हजार ९५० रुपयाचा ऐवज जप्त केला. ही कारवाई खानापूर (ता. देगलूर) शिवारात शनिवारी (ता. सहा) सायंकाळी केली. 

देगलूर तालुक्यात अवैध धंदे जोरात चालतात. हा तालुका तेलंगना राज्याच्या सिमेवर असल्याने या परिसरात गुन्हेगार तेलंगनात गुन्हे करतात व इकडे येतात. तर इकडे गुन्हे करुन तेलंनगात जावून लपून बसतात. या गुन्हेगारांना देगलूर व मरखेल पोलिस पाठीशी घालतात. या पोलिस ठाण्याच्या हद्दीत मटका, जुगार, देशी दारु, शिंदी यासह वाळूचा अवैध धंदा चालतो. गुन्हेगारावर पोलिसांचे वचक राहिले नसल्याने अवैध धंदेवाल्यांनी आपले कारनामे सुरू केले आहेत. 

हेही वाचा -  का कवटाळले तिने मृत्यूला...? वाचा सविस्तर

संभाजी पाटील यांच्या शेतात सुरू झन्ना-मन्ना

देगलूर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक महेंद्रसिंग ठाकूर हे आपल्या ठाण्याच्या हद्दीत खानापूर परिसरात गस्त घालत होते. यावेळी त्यांना मिळालेल्या माहितीवरून खानापूर शिवारात संभाजी पाटील यांच्या शेतात सुरू असलेल्या झन्ना-मन्ना नावाच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी पोलिसांनी माधव यावलवाड, गजानन कुशोबा, जगन यनलवाड, सतीश बामणे, नरेश बेलबुते, हबीब मैनोद्दीन, सादुल मियासाब, बालाजी यनलवाड, अजीत बकतवाड, संदेश ठीगळे, गजानन येनलवाड, विठ्ठल दोदलवाड, सुधाकर कलाने यांना अटक केली. त्यांच्याकडून रोख रक्कम ११ हजार ९५० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले. फौजदार महेंद्रसिंग ठाकूर यांच्या फिर्यादीवरुन देगलुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक श्री. कंधारे करत आहेत. 

सोनखेड पोलिस ठाण्याला मिळाला ठाणेदार 

नांदेड : गुटखा प्रकरणी चर्चेत आलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधाकर आडे यांना नियंत्रण कक्षात बोलावून घेतल्यानंतर सोनखेड ठाण्याची जबाबदारी आता स्थानकि गुन्हे शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव मांजरमकर यांना देण्यात आला आहे. रविवारी (ता. आठ) सकाळी श्री. मांजरमकर यांनी पोलिस ठाण्याचा पदभार घेतला आहे.

येथे क्लिक कराशिक्षकांनाच साधावा लागेल पालकांशी संवाद, काय आहे कारण?

सोनखेड पोलिस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार सुधाकर आडे यांच्या तक्रारी पोलिस अधीक्षक कार्यालयात आल्या होत्या. त्यातच त्यांनी मोठा आर्थीक घोटाळा करून विनापरवाना व बंदी असलेला गुटखा वाहतुक करणारा ट्रक सोडून दिला. त्यामुळे पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी त्यांना नियंत्रण कक्षात तैणात केले. यानंतर सोनखेड पोलिस ठाण्याचा कारभार सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव मांजरमकर यांच्या खांद्यावर टाकला. श्री. मांजरमकर यांनी रविवारी (ता. आठ) पदभार घेतला. या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैद धंदे बंद करणार असून कुठल्याही राजकीय दबावाला बळी पडणार नसल्याचे श्री. मांजरमकर यांनी सांगितले. 
 

loading image