Devendra Fadnavis: झेंडावंदनासाठी गेलेल्या फडणवीसांसमोर तरूणांची घोषणाबाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis: झेंडावंदनासाठी गेलेल्या फडणवीसांसमोर तरूणांची घोषणाबाजी

नांदेड : आज संपूर्ण मराठवाड्यात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जातो. त्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नांदेड येथे झेंडावंदनासाठी गेले होते. यावेळी तरूणांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच पोलीस भरतीसाठी घोषणाबाजी केली आहे. त्यानंतर पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या तरूणांना शांत केले.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस नांदेडमध्ये असताना तरूणांनी पोलीस भरतीसाठी घोषणाबाजी केली. लवकरात लवकर पोलीस भरती व्हावी अशी मागणी तरूणांनी केली असून थोडा वेळ गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर पोलिसांनी तरूणांवर लाठीचार्ज केल्याचा प्रकार समोर आला आहे.

घोषणाबाजीमुळे केलेल्या लाठीचार्जमुळे विद्यार्थी जास्त आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. "गेल्या काही वर्षापासून पोलीस भरती झाली नसून विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने लवकरात लवकर पोलीस भरती जाहीर करावी" असं मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केलं आहे.