esakal | लेंडी प्रकल्पाचे खरे जनक देवेंद्र फडणवीस- कोण म्हणाले वाचा...?
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिल्यामुळेच धरणग्रस्तांच्या मावेजाचा प्रश्‍न सुटू शकला आहे.

लेंडी प्रकल्पाचे खरे जनक देवेंद्र फडणवीस- कोण म्हणाले वाचा...?

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबीत असलेल्या मुखेड तालुक्यातील लेंडी प्रकल्पाच्या कामाला गती प्राप्त करुन धरण पूर्णत्वाकडे नेण्यासाठी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिल्यामुळेच धरणग्रस्तांच्या मावेजाचा प्रश्‍न सुटू शकला आहे. त्यामुळेच लेंडी प्रकल्पाचे खरे जनक देवेंद्र फडणवीसच असल्याचा दावा नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केला आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ५० व्या सुवर्णमहोत्सवी जन्मदिनाचे औचित्य साधून देगलूर भाजपाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘सुवर्ण कमल दल या सेवाभावी उपक्रमाचे उद्घाटन ता. १९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे नांदेड जिल्ह्याचे भाजपा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा प्रदेशचे सरचिटणीस आमदार सुरजितसिंह ठाकूर हे होते.

सुवर्ण कमल दल या सेवाभावी उपक्रम

येत्या ता. २२ जुलै रोजी देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे. फडणवीस यांच्या सुवर्णमहोत्सवी वाढदिवसाचे औचित्यसाधून देगलूर भाजपाच्यावतीने सुवर्ण कमल दल या सेवाभावी उपक्रमात देगलूर शहरात सॅनिटायझरची फवारणी करणे, वृक्षारोपण लागवड, सॅनिटॉयझर बाटल्यांचे वाटप, शालेय साहित्याचे वाटप, अन्नधान किटचे वाटप, मास्कचे वाटप, पालिकेच्या सफाई कर्मचार्‍यांना किटचे वाटप असा सुवर्ण कमल दल सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या क्रार्यकामाचे रविवार ता. १९ जुलै रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे खा. चिखलीकरांच्या हस्ते उद्घाटन करताना ते म्हणाले, लेंडी धरणाचे     भूमीपूजन कै. शंकररावजी चव्हाण यांच्या हस्ते झाले पण हा प्रकल्पक पूर्णत्वाकडे नेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी भरीव निधी उपलब्ध करुन देवून कामाला चालना दिली. 

हेही वाचा -  गाव पातळीवर कोरोना दूत समिती स्थापन करा- मुख्यमंत्र्यानी दिल्या शिवसेना जिल्हाप्रमुखांना सुचना

प्रकल्पग्रस्तांना धनादेशाचे वाटप करण्याचे काम जिल्ह्याचे पालकमंत्री करीत आहेत

फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात नांदेड जिल्ह्यात अनेक विकास प्रकल्पाला त्यांनी भरीव निधी उपलब्ध करुन दिल्यामुळे गती प्राप्त झाली आहे. लेंडी धरणग्रस्तांच्या मालमत्तेच्या मावेजाचा निधी फडणवीस यांच्या काळातच मंजूर झाला आहे. आताच्या महाविकास आघाडी सरकारने एक दमडीचाही निधी उपलब्ध करुन दिला नाही. प्रकल्पग्रस्तांना धनादेशाचे वाटप करण्याचे काम जिल्ह्याचे पालकमंत्री करीत आहेत. नांदेड जिल्ह्यात  नॅशनल हायवे रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी फडणवीस यांनीच पुढाकार घेतला असल्याचे स्पष्टीकरण खा. चिखलीकर यांनी यावेळी केले.
 

loading image
go to top