esakal | Nanded : सव्वापाचशेपेक्षा अधिक दिव्यांगांना कृत्रिम अवयवाचे वाटप
sakal

बोलून बातमी शोधा

दिव्यांगांना कृत्रिम अवयवाचे वाटप

नांदेड : सव्वापाचशेपेक्षा अधिक दिव्यांगांना कृत्रिम अवयवाचे वाटप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : दिव्यांग व्यक्तींच्या मदतीसाठी, पुनर्वसनासाठी आणि त्यांना आत्मसन्मान मिळवून देण्याच्या उद्देशाने दिव्यांग व्यक्तींसाठी साधू वासवानी मिशन पुणे, लायन्स क्लब नांदेड मिडटाउन, प्रेमकुमार फेरवानी मित्रमंडळ, पुज्य सिंधी पंचायत नांदेड आणि विश्व सिंधी सेवा संगम यांच्या वतीने शहरातील पीपल्स महाविद्यालयात दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात ५२० गरजुवंताना कृत्रिम अवयवांचे वाटप करण्यात आले.

या शिबिराचे शनिवारी (ता. नऊ) माजी पालकमंत्री डी.पी. सावंत यांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात आले. या वेळी अध्यक्षस्थानी लॉयन्स क्लबचे डिस्ट्रिक्ट प्रांतपाल दिलीप मोदी, साधु वासवानी मिशनचे सुंदर वासवानी, लॉयन्स क्लब नांदेड मिडटाउनचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र कदम, प्रकल्प प्रमुख प्रेमकुमार फेरवानी, सचिव विश्वजीत राठौड, प्रवीण अग्रवाल, सतीश सामते व पुज्य सिंधी पंचायतचे अध्यक्ष नारायणदास रंगनानी, नरेन्द्र परमानी, कन्हैयालाल धनवानी यांची उपस्थिती होती.

हेही वाचा: ‘लखीमपूर’च्या निषेधार्थ आज महाराष्ट्र ‘बंद’

नैसर्गिकरित्या किंवा अपघातात ज्या व्यक्तीने हातपाय गमावले आहेत. त्यामुळे अनेकांच्या आयुष्यामध्ये अनंत अडचणी निर्माण झाल्या. दैनंदिन जीवन जगण्यासाठीही त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो अशा दिव्यांग व्यक्तींच्या मदतीसाठी आणि त्यांचा स्वाभिमान जागृत करून त्यांना सन्मानाचे जीवन देण्यासाठी साधू वासवानी मिशन पुणे, प्रेमकुमार फेरवानी मित्र मंडळ, लायन्स क्लब नांदेड मिडटाउन, पूज्य सिंधी पंचायत नांदेड आणि विश्व सिंधी सेवा संगम यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगांसाठी कृत्रिम हात पाय वाटप शिबिरात सहभागी झालेल्या दिव्यांगामध्ये नांदेड जिल्ह्यासह बीड, परभणी, हिंगोली, जालना, यवतमाळ, अमरावती आदी जिल्ह्यातील दिव्यांगाचाही समावेश होता.

शिबिर यशस्वीतेसाठी योगेश जायसवाल, राजेंद्र हुरणे, रमेश मिरजकर, मनिष माकन, विश्वजीत राठौड, संजय पलेवार, सुधाकर चौधरी, साजिद विन्दानी, ओमप्रकाश मानधने, नरेश वोरा, विजय होकर्णे, सुनील देशपांडे, दीपक रंगनानी, सतीश निहलानी, हरीश लालवानी, अशोक खियानी यांनी परिश्रम घेतले.

loading image
go to top