esakal | नांदेडमधील ‘या’ बँकेद्वारे पंचविस लाखाचे घरपोच वाटप
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

सालेगाव येथील नागरिक आपले दुसऱ्या बँकेतील खात्यावरचे पैसे गावात ब्रँच पोस्ट मास्तर श्री.बळवंत शिंदे यांच्या पोस्ट बँकेच्या Aeps द्वारे दोन महिन्यात पंचवीस ते तीस लाखाची पैशाची उचल घरपोच एकाच गावात करण्यात आली आहे.

नांदेडमधील ‘या’ बँकेद्वारे पंचविस लाखाचे घरपोच वाटप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : धर्माबाद तालुक्यातील सालेगावचे शाखा पोस्ट मास्तर यांनी लॉक डाउनच्या महामारीत सालेगाव येथील नागरिक आपले दुसऱ्या बँकेतील खात्यावरचे पैसे गावात ब्रँच पोस्ट मास्तर श्री.बळवंत शिंदे यांच्या पोस्ट बँकेच्या Aeps द्वारे दोन महिन्यात पंचवीस ते तीस लाखाची पैशाची उचल घरपोच एकाच गावात करण्यात आली आहे.

टपाल पोस्ट मास्तर हे कोरोनाच्या महामारीत गावातील जनतेला पैशाची कमी पडू नये. पैशा वाचून  रुग्णाचे उपचार रोखू नये, गोरगरीब अन्न धान्य पासून उपवासपोटी राहू नये म्हणून त्यांनी गावात कोणीही बाहेर गावी जाऊन बँकेतील पैसे व सरकारी अनुदान घेण्यासाठी बाहेर गावी जाऊ नये. आपल्या कोणत्याही बँक खात्यातील पैसे पोस्ट बँकेच्या मायक्रो ATM व Aeps द्वारे घरपोच काढून देण्यात येईल अशी जनजागृती गावात केली आहे.

हेही वाचा -  नांदेडची शतकाकडे वाटचाल : आज पुन्हा १३ पॉझिटिव्ह

पोस्ट बँकेच्या Aeps द्वारे

या जनजागृतीला गावातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. गावातील नागरिक दररोज ब्रँच पोस्ट मास्तर दररोज दरावर आले की इतर बँकेतील पैसे पोस्ट बँकेच्या Aeps द्वारे रोख रक्कम काढले. या लॉकडाउनमध्ये शाखा पोस्ट मास्तर यांनी सालेगावंमध्ये जवळपास पंचवीस ते तीस लाखाचे Aeps द्वारे घरपोच पैसे दिल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

डाक अधीक्षक शिवशंकर लिंगायत यांनी त्यांचे कौतुक केले. 

प्रत्येकाच्या घरी जाऊन ग्रामीण डाक जीवन विमा ६०० नागरिक लाभार्थी आहेत तर गावातील ० ते १० वर्षाच्या आतच्या मुलीची सुकन्या समृद्धी खाते योजना जवळपास ३०० लाभार्थी मुलीच्या खाते उघडले आहे. तसेच ४०० च्यावर, बचत खातेदार दररोज पैशाची जमा व उचल करीत आहेत. आर. डी. खाते पाच वर्षीय खातेदार एक हजाराच्या वर आहेत यांचा महिना भरणा मोठा आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे खाते ८०० च्यावर असल्याने दर महिन्याला या ब्रँच पोस्ट मास्तर यांच्या बीओमध्ये लाखो रुपयांची गुंतवणूक गावातील नागरी केली आहे. डाक अधीक्षक शिवशंकर लिंगायत यांनी त्यांचे कौतुक केले. 
 

loading image