जिल्हा सैनिक कार्यालयाचे कामकाज सुरू

File Photo
File Photo

नांदेड : जिल्हा सैनिक कार्यालयाचे कामकाज सोमवार (ता.२५) पासून नियमितपणे सुरु झाले आहे. ६० दिवसांपासून कामकाज बंद असल्याने अनेक कामांचा बोजवारा पडलेला आहे. परंतु, अतिशय महत्वाची आणि कमी महत्वाची कामे असे कामाचे दोन भाग करुन त्यानुसार प्राथमिकतेनुसार कामांचा निपटारा करण्यावर भर दिला जात असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली. 

ज्या माजी सैनिकांचे निधन झाले आहे, त्यांच्या वारस पत्नी, अवलंबितांनी नाव नोंदणी व आर्थिक सहायताच्या कामांसाठी नांदेड जिल्हा सैनिक कार्यालयात नमूद कागदपत्रे घेवून यावीत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

नाव नोंदणीचे व इतर कामे प्रलंबित
कोराना प्रादुर्भावामुळे चालू असलेल्या लॉकडॉउन कालावधीत नांदेड जिल्ह्यातील बऱ्याच माजी सैनिकांची नाव नोंदणीचे व इतर कामे प्रलंबित झालेली आहेत. दुर्देवाने काही माजी सैनिकांचा या कालावधीत निधनही झाले आहे. कार्यालय दुरध्वनीवरुन सर्व प्रभावित माजी सैनिकांच्या संपर्कात असून योग्य ते मार्गदर्शन व तातडीचे सर्व कार्य करीत आहे.

हेही वाचा- सावधान : कोरोना रुग्ण शतकापार गेलेल्या नांदेडमध्ये सर्व अलबेल
सकाळी दहा ते दोन यावेळेत संपर्क साधा
ज्या माजी सैनिकांचे निधन झालेले आहे, त्यांच्या वारस पत्नी, अवलंबितांनी नाव नोंदणी व आर्थिक सहायताच्या कामासाठी नांदेड जिल्हा सैनिक कार्यालयात पुढीलप्रमाणे कागदपत्रे घेवून यावीत. यामध्ये माजी सैनिकाचे ओळखपत्र जमा करण्यासाठी,  मुळ डिस्जार्ज बुक, पीपीओ व बँक पासबुक (माजी सैनिकाचे व पत्नीचे), वारस पत्नीचे तीन फोटोग्राफस व आधार कार्ड,  AGI Claim साठी Extended Army Group Insurance Cert, मृत्यु प्रमाणपत्र मुळ या सर्व प्रमाणपत्रांच्या छायांकित तीन प्रतिसह शक्यतो सर्वांनी सकाळी दहा ते दुपारी दोन यावेळेत मोबाईल क्रमांक ९४०३०६९४४७ वर संपर्क करुन यावे, असेही आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com