esakal | विधायक : नायगाव येथे 'साई माऊली' कोविड सेंटरचे डॉ. विपीन यांच्या हस्ते उद्घाटन

बोलून बातमी शोधा

naigaon kovid
विधायक : नायगाव येथे 'साई माऊली' कोविड सेंटरचे डॉ. विपीन यांच्या हस्ते उद्घाटन
sakal_logo
By
प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव ( जिल्हा नांदेड ) : समाज माध्यमातून दरवेळी नकारात्मकच चर्चा होत नसते तर सकारात्मक चर्चाही होवू शकते आणि या सकारात्मक चर्चेतून नायगावला चक्क कोरोना सेंटरची निर्मिती झाली. लोकसभागातून सुरु करण्यात आलेल्या 'साई माऊली' सार्वजनिक कोविड सेंटरचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांच्या हस्ते शनिवारी (ता. २४) सकाळी पार पडले. त्यामुळे नायगावकर नुसते बोलून नाही तर करुनही दाखवतात याचा प्रत्यय यानिमित्ताने आला आहे.

यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने, आमदार अमर राजुरकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय बेळगे, माजी उपमहापौर आनंदराव पाटील चव्हाण आदी मान्यवरांची उपस्थिती होती. समाज माध्यमातून चुकीचीच माहिती पसरवल्या जात असल्याचा अनेकांचा आरोप असतो पण याच समाज माध्यमातून चांगलेही काम होवू शकते हे नायगावकरांनी दाखवून दिले आहे.

आवाज नायगावचा या व्हाट्सएप ग्रुपवर वाढत्या कोरोनावर चिंता व्यक्त करण्यात येत असतांना सामाजिक जाणिवेतून काम करणारे डॉ. विश्वास चव्हाण यांनी लोकसभागातून नायगावलाही सार्वजनिक कोविड सेंटर झाले पाहिजे ही संकल्पना मांडली. या संकल्पनेला सर्वानीच सकारात्मक प्रतिसाद दिला अनेकांनी सहकार्य करण्याबरोबरच मदतीची तयारी दाखवली. त्याचबरोबर सामाजिक दायित्वाच्या जिल्हा बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांनी लिटल स्टेप ही शाळा कोविड सेंटरला उपलब्ध करून तर दिलीच आणि जी काही मदत लागेल ते सुद्धा देण्याचा शब्द दिला.

हेही वाचा -

दानशुरांच्या दातृत्वातून सार्वजनिक कोविड सेंटरची उभारणी झाल्यानंतर शनिवारी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असल्याने नागरिकांनी बिनकामी न फिरता प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले. उद्घाटनाचे प्रास्ताविक प्रा. रवींद्र चव्हाण यांनी केले तर आभार धनराज शिरोळे यांनी मानले.

यावेळी बिलोली उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ, नायगाव उपजिल्हाधिकारी महेश जमदाडे, तहसीलदार गजानन शिंदे, नगरपंचायतचे मुख्याधिकारी नंदकिशोर भोसीकर, श्रीनिवास चव्हाण, विजय चव्हाण, पोलिस निरीक्षक आर. एस. पडवळ, वैद्यकीय अधिक्षक एच. आर. गुंटूरकर, डॉ. विश्वास चव्हाण, पत्रकार नागेश कल्याण, चेअरमन प्रदीप पा. कल्याण, यादव पाटील शिंदे, पांडुरंग चव्हाण, माणिक चव्हाण, साईनाथ मेडेवार, प्रताप पा. सोमठाणकर, सतीश लोकमनवार, बालाजी शिंदे, गणेश नायगावकर, सुधाकर जवादवार, कैलास रामदिनवार, साईनाथ घन्नावार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

संपादन- प्रल्हाद कांबळे