नांदेड : परिचारिका संघटना आंदोलनाच्या पावित्र्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr PT Jamdade against State Nurses Association agitation

नांदेड : परिचारिका संघटना आंदोलनाच्या पावित्र्यात

नांदेड : विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील प्रभारी अधिष्ठाता डॉ. पी. टी. जमदाडे हे सातत्याने परिचारिकांच्या विरोधी भूमिका घेत आहेत. त्यामुळे त्याचा निषेध करत परिचारिका वर्गाच्या स्थानिक पातळीवरील मागण्या मान्य झाल्या नाही तर येत्या काळात राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेच्या वतीने कळविण्यात आले आहे.

विष्णुपुरीचे शासकीय रुग्णालय हे जिल्ह्यातील सर्वात मोठे रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय आहे. मात्र, या महाविद्यालयाचा कारभार प्रभारी अधिष्ठाता यांच्यावर सुरु आहे. त्यामुळे परिचारिका संघटनेनी अधिष्ठाता व कार्यालयीन कर्मचारी यांच्यावर लावलेल्या आरोपात कितपत तथ्य आहे, हे सध्या सांगता येणार नाही. मात्र, परिचारिका संघटनेने केलेले आरोप खरे आहेत किंवा खोटे आहेत, असे म्हणता येणार नाही.

महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचे जिल्हा खजिनदार रवी शिसोदे यांच्याकडून प्रभारी अधिष्ठाता डॉ. जमदाडे यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. त्यात म्हटले आहे की, डॉ. जमदाडे यांनी पदभार सांभाळल्यापासून परिचारिका वर्गाचा एकही प्रश्न मार्गी लागला नाही. प्रत्येक कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामाचा मोबदला मागितला जातो. लिपिकापासून ते अधिकारी वर्गापर्यंत पैशाची मागणी केली जाते. पैसे दिले नाही तर फाईल काही कालावधीसाठी लंपास केली जाते. त्यामुळे कर्मचारी वर्गास मानसिक अडचणीला सामना करावा लागत आहे. वैद्यकीय बिल मंजुरीसाठी देखील पैशाची मागणी केली जाते. हा सर्व प्रकार अधिष्ठाता यांना सांगून देखील त्यावर कसल्याही प्रकारची कार्यवाही केली जात नसल्याचे संघटनेचे मत आहे.

येत्या काळात राज्य परिचारिका संघटनेच्या नांदेड शाखेच्या वतीने अधिष्ठाता डॉ. जमदाडे यांच्या निषेधार्थ काम बंद आंदोलन करण्याच्या भूमिकेत आहे. त्या बाबत संघटनेचे पदाधिकारी आयुक्त (डीएमईआर, मुंबई) व जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेणार येणार असल्याचे ते म्हणाले. ‘अधिष्ठाता हटाव, नर्सिंग बचाव’ असा नारा परिचारिका वर्गातून दिला जाणार असल्याचे देखील संघटनेच्या वतीने कळविण्यात आले आहे.

शासकीय रुग्णालयाची व महाविद्यालयाची पूर्वीची परिस्थिती फार चांगली नव्हती. ती परिस्थिती सुधारण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यासाठी मला सर्वांच्या पाठिंब्याची गरज आहे. माझ्याकडे आलेले कुठलेही बिल थकवले जात नाही. मात्र, त्यापूर्वी प्रत्येक बिलाची क्रमवारी लावली जाते. त्यानंतर बजेटनुसार बिले काढली जातात. बजेट आल्यानंतर सर्वप्रथम कर्मचाऱ्यांच्या पगारी होतात. त्यानंतर इतर बिले काढली जातात. संघटना या मागील तारखेतील बिल जमा करतात. त्यांना तत्काळ बिले हवी असतात. आणि जेव्हा त्यांच्या मनासारखे होत नाही. तेव्हा ते माझ्यावर आरोप करतात पण त्यात तथ्य नाही.

- डॉ. पी. टी. जमदाडे, अधिष्ठाता.

Web Title: Dr Pt Jamdade Against State Nurses Association Agitation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top