गाव पातळीवर कोरोना दूत समिती स्थापन करा- मुख्यमंत्र्यानी दिल्या शिवसेना जिल्हाप्रमुखांना सुचना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

आरोग्य कोरोना दूत समिती स्थापन करून तळागाळातील व सर्वसामान्य नागरिकांना आधार देण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (ता. १९) घेतलेल्या झूम ॲप मिटींगद्वारे शिवसेना जिल्हाप्रमुखांना सुचना दिल्या. 

गाव पातळीवर कोरोना दूत समिती स्थापन करा- मुख्यमंत्र्यानी दिल्या शिवसेना जिल्हाप्रमुखांना सुचना

नांदेड : राज्यात कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता ग्रामीण भागात गोरगरिबांना या आजाराचा त्रास होऊ नये यासाठी शिवसेनेच्या वतीने लवकरच आरोग्य कोरोना दूत समिती स्थापन करून तळागाळातील व सर्वसामान्य नागरिकांना आधार देण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (ता. १९) घेतलेल्या झूम ॲप मिटींगद्वारे शिवसेना जिल्हाप्रमुखांना सुचना दिल्या. 

बैठकीत दिल्या राज्यातील शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीनचे बियाणे अनेक ठिकाणी उगवले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठे आर्थिक संकट सहन  करावे लागत आहे. या प्रकरणात संबंधित कंपन्याविरुद्ध नांदेड जिल्ह्यात विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. परंतु अद्याप यातील एकाही कंपनी चालकास किंवा वितरकास पोलिसांकडून अटक करण्यात आले नाही. अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. यावेळी मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी या प्रकरणात विशेष लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करु. यावेळी जिल्हाप्रमुख उमेश मुंडे आणि आनंद तिडके बोंढारकर यांचीही उपस्थिती होती. 

हेही वाचा -  गुरुद्वारा बोर्डाचे दोन सदस्य का झाले निलंबित... वाचा सविस्तर

हातावर पोट असणाऱ्या लोकांची मदत करा

राज्यात सध्या कोरोनाचे थैमान सुरू असून याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. ग्रामीण भागात सर्वसामान्य जनतेला मदत करण्यासाठी   शिवसैनिकांनी पुढे आले पाहिजे. परंतु आपला जीव धोक्यात न घालता सुरक्षित अंतर ठेवून हातावर पोट असणाऱ्या लोकांची मदत करा. अशा सूचनाही मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुखांना दिल्या. शासनाने दिलेली कर्ज मुक्तीची अंमलबजावणी नांदेड जिल्ह्यात जवळपास बऱ्यापैकी अमलात आली असून लॅाकडाऊनमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना आपल्या बँक खात्यात कर्जमुक्तीचा लाभ मिळाला आहे. नांदेड शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या जरी वाढली तरी ती नियंत्रणात असून आरोग्य व जिल्हा प्रशासन त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी सतत प्रयत्न करत असल्याची माहिती श्री कोकाटे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली.

सर्वांनी प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे

जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा व रुग्णांची संख्या तसेच आरोग्य सुविधेबद्दल मुख्यमंत्र्यांनी जिल्हाप्रमुखांना माहिती विचारली. स्वतःचा जीव धोक्यात न घालता कुठलेही मोठे कार्यक्रम घेऊ नका, तसेच कार्यक्रमावर होणारा खर्च हा तळागाळातील सर्वसामान्य गोरगरिबांना द्या. असे आवाहनही त्यांनी केले.  शेतकऱ्यांच्या हितासाठी नक्कीच राज्याच्या गृह सचिव व गृहमंत्र्यांना सूचना देणार असून बनावट सोयाबीन उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या मालकांना व वितरकांना लवकरच अटक करण्याच्या सूचना देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केले. आरोग्य कोरोना दूत समितीच्यावतीने शिवसैनिक आपल्या गावपातळीवर आता जोमाने कामाला लागून कोरोनाचा प्रादूर्भाव कमी करण्यासाठी प्रशासनासोबत राहणार आहेत. कोरोनावर विजय मिळवायचा असेल तर सर्वांनी प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे असे आवाहनही जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांनी केले आहे.  
 

loading image
go to top