नांदेड : मरळक रस्त्यावरील घनदाट जंगलात अनुभवा पक्षांची रंगीबेरंगी दुनिया

प्रमोद चौधरी
Tuesday, 10 November 2020

नांदेडमधील पक्षीमित्र तसेच हौशी छायाचित्रकार वरद साईनाथ चिद्रावार याने नांदेडपासून जवळच असलेल्या मरळक रस्त्यावरील घनदाट जंगलात पक्षी सप्ताहानिमित्त भटकंती करताना रंगीबेरंगी पक्षांना आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद आहे. 

नांदेड : अरण्यऋषी मारोती चित्तमपल्ली आणि डॉ. सलीम यांच्या जन्मदिवसानिमित्त पाच ते १२ नोव्हेंबर या कालावधीमध्ये पक्षी सप्ताह सुरु आहे. त्यानिमित्त विविध पक्षीमित्र पक्षी न्याहाळण्यासाठी रानोमाळ भटकंती करत आहेत. त्यापैकीच नांदेड येथील हौशी पक्षीमित्र वरद चिद्रावार असून, त्यांनी नांदेडपासून जवळच असलेल्या मरळक रस्त्यावरील घनदाट जंगलात टिपलेल्या पक्षांची ही काही छायाचित्रे.


करड्या डोक्याचा धोबी पक्षी

करड्या डोक्याचा धोबी किंवा भाटुकली. पिवळा धोबी हा आकाराने चिमणीएवढाच असतो. पिवळा धोबी पाकिस्तान आणि भारतात गंगेचे मैदान ते दक्षिणेकडे कच्छ्, कन्याकुमारी, श्रीलंका आणि पूर्वेकडे बांगला देश ते ब्रम्हदेश व अंदमान आणि निकोबार बेटे या भागात आढळतो.  


निखार

निखार पक्षी त्याच्या सुंदर रंगासाठी (संत्रा आणि पिवळा) ओळखला जातो. दक्षिण आशियामध्ये भारतीय उपखंडातील पूर्वेपासून इंडोनेशियापर्यंत हा पक्षी आढळतो. 


खंड्या

खंड्या किंवा किलकिल्या हा लहान आकारातील पाणथळी जागेजवळ रहाणारा पक्षी आहे. तो बहुतांश बल्गेरिया, तुर्की, पश्चिम आशिया, भारतीय उपखंडापासून फिलिपिन्सपर्यंत आढळतो. लहान आकार, अत्यंत आकर्षक रंग, हे त्याचे वैशिष्ट्य. 


स्पॅरो-लार्क

राख-मुकुट असलेला स्पॅरो-लार्क हा लार्क कुटूंबाचा एक लहान चिमणी आकाराचा सदस्य आहे. दक्षिण आशिया ओलांडून मोकळे जमीन, गवत आणि झाडे असलेल्या मोकळ्या जागेत आढळतो. 


सुभग

सुभग हा पक्षी दक्षिण व आग्नेय आशिया या भूभागात आढळणारा सुभगाद्य कुळातील पक्ष्यांची प्रजाती आहे. साधारण १४ सें. मी. आकाराचा सुभग सुंदर शिटी वाजवणारा पक्षी आहे. सुभग वरून काळा आणि खालून पिवळ्या रंगाचा असून पंखावर काळे-पांढरे पट्टे असतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Experience Colorful World Of Birds In The Maralak Road Nanded News