नांदेड जिल्ह्यात ऐन पेरणीत शेतकरी आत्महत्या; कर्जबाजारीपणामुळे उचलले पाऊल

लोहा तालुक्यातील धावरी तांडा येथे राहणारा गोविंद मोतीराम राठोड (वय ५५) या शेतकर्‍याने आठ जून रोजी सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून विष प्राशन केले.
लोहा तालुक्यात शेतकरी आत्महत्या
लोहा तालुक्यात शेतकरी आत्महत्या

नांदेड : लोहा तालुक्यातील एका शेतकऱ्याने ऐन पेरणीत सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे कंटाळून विष प्राशन करुन आत्महत्या केली. ही घटना ता. आठ जून ते ता. १७ जूनच्या दरम्यान घडली. उपचारादरम्यान शेतकऱ्याचा विष्णुपूरी येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. गोविंद मोतीराम राठोड असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की लोहा तालुक्यातील धावरी तांडा येथे राहणारा गोविंद मोतीराम राठोड (वय ५५) या शेतकर्‍याने आठ जून रोजी सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून विष प्राशन केले. बेशुद्धावस्थेत त्याला नातेवाईकांनी नांदेड येथील विष्णुपूरीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्याने दहा दिवस मृत्यूशी झुंज दिली. मात्र त्याची झुंज ता. १७ जून रोजी अपयशी ठरली. शेवटी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. लवकुश गोविंद राठोड याच्या माहितीवरुन लोहा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस उपनिरीक्षक श्री. केंद्रे करत आहेत.

हेही वाचा - विद्यूत डीपी फोडून सव्वापाच लाखांची चोरी; वसमत येथील घटना

तर दुसर्‍या घटनेत बिलोली येथील वैभव क्रेशर मशीन खदानीमध्ये काम करणाऱ्या संदीप खंडू देवकर (वय २७) या कामगारास वेल्डिंग करत असताना विद्युत शॉक लागला. त्याला ता. 22 जून रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास सरकारी दवाखाना बिलोली येथे दाखल केले असता त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. अंकुश खंडू देवकर यांच्या माहितीवरुन बिलोली पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार श्री. शिंदे करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com