शेतकरी पुन्हा संकटात : गाय, बैलांवर ‘या’ संसर्गजन्य आजाराचे विघ्न

प्रल्हाद कांबळे
Friday, 28 August 2020

जनावरांवर एका संसर्गजन्य आजाराने त्रस्त झाले आहे. जिल्ह्यातील पशुधनावर ‘या’ संसर्गजन्य रोगाचे विघ्न आले आहे.

नांदेड : कोरोनासारख्या गंभीर आजारात तग धरुन ह्या संकटावर मात करण्यासाठी सज्ज असलेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा दुसरे संकट कोसळले आहे. त्यांच्या पाळीव जनावरांवर एका संसर्गजन्य आजाराने त्रस्त झाले आहे. जिल्ह्यातील पशुधनावर ‘या’ संसर्गजन्य रोगाचे विघ्न आले आहे. या रोगाचा विषाणू तब्बल ३५ दिवस जिवंत राहू शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे. 

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने या रोगाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी कंबर कसली आहे. विविध स्तरावर प्रयत्न सुरु केले आहेत. विशेष म्हणजे या आजारात सुद्धा बाधित पशुधनाचे विलगीकरण करावे लागणार आहे. ‘लम्पी स्किन डिसीज’ या रोगाचा प्रादुर्भाव सुरू झालेला आहे. हा रोग विषाणूजन्य रोग असून त्याचे जंतू जास्त काळ टिकतात. या जंतुचा प्रसार शेळी- मेंढी या प्रवर्गातील जनावरांना शक्यतो जाणवत नाहीत. शेळी - मेंढीमध्ये या विषाणूचे साधर्म्य आढळून येत असले तरी हा रोग त्यांना होत नाही.

हेही वाचा नांदेड : कारचालकास मारहाण करुन दोन लाखाची सोन्याची चैन पळविणाऱ्यास पोलिस कोठडी -

चावणाऱ्या माशा, डास, गोचीड, चिलटे यांच्यामार्फत फैलाव 

या रोगाचा प्रादुर्भाव बैल व गाय यांना होऊन म्हशींमध्ये त्याचा अधिक प्रमाणात जास्त प्रसार आहे. देशी गोवंशापेक्षा संकरित जनावरांमध्ये या रोगाची तीव्रता जास्त असल्याचे आढळून येत आहे. लहान व प्रौढ जनावरं या रोगांना अधिक बळी पडत आहेत. बाधित जनावरे अशक्त होतात, दूध उत्पादन घटते, त्याची प्रकृती खराब होऊन जनावर विकृत दिसतात. चावणाऱ्या माशा, डास, गोचीड, चिलटे यांच्यामार्फत फैलाव पशुधनात होतो. विषाणूंचे संक्रमण झाल्यानंतर एक ते दोन आठवडे रक्तामध्ये त्या जंतुचे वास्तव्य राहते. त्यानंतर शरिराच्या इतर भागात संक्रमण होते. 

दूध पिणाऱ्या वासरांना ही या आजाराची लागण होण्याची भीती 

बाधित जनावराच्या नाकातील स्राव, डोळ्यातील पाणी, तोंडातील लाळ यातून विषाणूबाहेर पडून चारा व पाणी दूषित होऊन त्याचा प्रसार इतर जनावरांना होत आहे. जनावरास प्रादुर्भाव झाल्यास त्याचा गर्भपात अथवा रोगग्रस्त वासरांचा जन्म तर दूध पिणाऱ्या वासरांना ही या आजाराची लागण होण्याची भीती असल्याने पशुपालक धास्तावले आहेत. जनावरातील या संसर्गजन्य आजारावर प्रभावी उपचार उपलब्ध नसल्याने जनावरांचे लसीकरण करावे लागणार आहे. हा रोग शंभर वर्षांच्या इतिहासात  झाल्याची नोंद नाही असेही तज्ञांचे म्हणणे आहे.

येथे क्लिक कराकोरोना उपचार : बारडच्या रुपेश देशमुख यांना कोवी शील्डचा पहिला डोस -

जिल्ह्यातील १८४ पशुवैद्यकीय दवाखाने सज्ज

पशुवैद्यकीय अधिकारी- कर्मचाऱ्यांकडून जनावरांमधील हा डिसीजचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वजम सज्ज झाले आहेत. बाधित जनावरांवर औषधोपचार करण्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. दवाखान्यांना पुरवठा झालेल्या औषध साठ्यामधून जास्तीत जास्त बाधित जनावरांना उपचार करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर यांनी प्रशासनाला दिले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers in crisis again: Disruption of infectious diseases on cows and bullocks nanded news