Nanded : मुलीच्या भविष्याच्या चिंतेने सालगड्याने केली आत्महत्या

पित्याने दवाखान्यात जातो असे असे सांगून लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
suicide
suicidesakal

अर्धापूर (जि.नांदेड) : शहरातील सावतामाळी नगरात राहणाऱ्या सालगड्याने आपल्या मुलीचे भविष्यात कसे होईल ? या चिंतेत असलेल्या सालगडी असलेल्या पित्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (ता.१२) सकाळी सहा वाजता उघडकीस आले आहे. या प्रकरणी अर्धापूर (Ardhapur) पोलिस ठाण्याच्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटने बाबत पोलिस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की शहरातील (Nanded Crime) सावतामाळी नगरात राहणारे उत्तम भिकाजी डोंगरे (वय ५५) यांच्या जावायांचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यामूळे आपल्या मुलीचे व लेकरांचे कसे होईल, अशी चिंता उत्तम डोंगरे यांना लागले होती. (Father Committed Suicide In Ardhapur Of Nanded District)

suicide
ऑपरेशनसाठी वडिल रुग्णालयात, बारावीतील विद्यार्थिनीची राहत्या घरी आत्महत्या

या चिंतेत असलेल्या पित्याने मंगळवारी सकाळी दवाखान्यात जातो असे असे सांगितले. अर्धापूर शिवारतील शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी संदीप डोंगरे यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणी पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक राठोड हे तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com