esakal | मुलाच्या डोळ्यासमोर बापाचा पाण्यात बुडून.....
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

नदीवर मेंढ्याना धुतल्यानंतर काही मेंढ्या गाळाता अडकल्याने त्यांना काढण्यासाठी तो तलावात उतरला .मात्र पाण्याचा अंदाज त्याला आला नसल्याने त्याचा गाळात फसुन पाण्यात बुडून मर पावला.

मुलाच्या डोळ्यासमोर बापाचा पाण्यात बुडून.....

sakal_logo
By
बालाजी नरहरे

आरळी ( जिल्हा नांदेड) : बिलोली तालुक्यातील आरळी येथील मेंढपाळ युवक हजप्पा गणपती बनसोडे (वय ४१) शनिवार( ता. १८) रोजी सकाळी अकरा वाजता गावाजवळ असलेल्या नदीवर मेंढ्याना धुतल्यानंतर काही मेंढ्या गाळाता अडकल्याने त्यांना काढण्यासाठी तो तलावात उतरला .मात्र पाण्याचा अंदाज त्याला आला नसल्याने त्याचा गाळात फसुन पाण्यात बुडून मर पावला. याप्रकरणी बिलोली पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
  
बिलोली तालुक्यातील आरळी येथील मेंढपाळ हजप्पा गणपती बनसोडे हा आपल्या कुटुंबाची उपजीवीका भागविण्यासाठी स्वतःची कांही मेंढ्या व इतरांची काही मेंढ्या घेऊन दररोजच्या प्रमाणे आपल्या मेंढ्या घेऊन माळरानावर चारण्यासाठी जात होता. गेल्या आठवड्यात सतत पाऊस झाल्याने, रस्त्यातच गावजवळ असलेल्या कुंडलवाडी नदीच्या बंधाऱ्याला काठोकाठ पाणी वाहत होते. तसेच गेल्या दोन वर्षा पूर्वी जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत बेळकोणी (बु) ते कौठा हद्यीपर्यंत आरळी गावाजवळून जाणाऱ्या नदीचे नाला सरळीकरण करण्यात आले होते. परंतू सदर नदीच्या काठेवर टाकलेली काळी माती पून्हा पावसाच्या पाण्यामुळे तीच माती नदीत आली व तिचा गाळ तयार झाला. 

हेही वाचानांदेड जि.प.च्या ग्रामीण रस्त्यांना जिल्हा मार्गाचा दर्जा- 257 किमीचे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग
 
मेंढ्याना अंघोळ घालणे बेतले जीवावर 

नदीच्या पाण्यात हजप्पा व त्याचा  एक लहान मुलगा वैभव (वय १५)  या दोघांनीही शनिवार (ता. १८) रोजी सकाळी अकरा वाजता आपले मेंढ्या धुवून बाहेर काढल्या होत्या. परंतू कांही मेंढ्या पाण्यातील गाळात फसल्या होत्या. तेंव्हा हजप्पा हा सदरील मेंढ्यांना बाहेर काढण्यासाठी पून्हा पाण्यात उतराला आणि लहान मुलगा वैभव बाकीचे मेंढ्या एकत्र करण्यात व्यस्त होता. कांही वेळेनंतर पाण्यातील मेंढ्या बाहेर आल्या, परंतू हजप्पा मात्र वर दिसला नाही. मुलाच्या लक्षात येताच शेजाऱ्यांना आवाज दिला असता कांही गावकऱ्यानी शोधा- शोध करून मयत हजप्पाचे प्रेत बाहेर काढले.

बिलोली पोलिस ठाण्यात नोंद

मयताचे वडिल गणपत बनसोडे यांनी बिलोली पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीवरुन पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहचले. पंचनामा करून प्रेताची उत्तरीय तपासणी करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय बिलोली येथे पाठविण्यात आले. नंतर प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. शोकाकुल वातावरणात आरळी येथे दुपारी चार वाजता त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई- वडिल, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

या आधी याच तलावात दोघांचा मृत्यू 
    
माजी आमदार सुभाष साबणे यांच्या अध्यक्षेतेखाली जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत केलेल्या नाला सरळीकरणाच्या निकृष्ठ कामामुळे, या वर्षात तिन व्यक्ती गाळात आडकल्यामुळे मृत्यू झाल्याने सदरील कामाबाबत गावकऱ्यातून संताप व्यक्त होत आहे. सदरील नदीच्या दोन्ही बाजूना दगडी भिंत बांधल्यास गाळ तयार होत नव्हता. सात महिन्यापूर्वी असेच  पिता- पुत्राचा गाळात आडकून मृत्यू झाला होता.

संपादन- प्रल्हाद कांबळे 

loading image