गुटखा व्यवसायासाठी व्यापाऱ्यांची ‘फिल्डींग’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जुलै 2020


शहरात आणि ग्रामीण भागात तंबाखू व रसायन मिश्रीत घातक गुटखा विक्रीला शासनाने बंदी आणली असता येथील काही व्यापारी संबंधीत अधिकाऱ्यांना हाताशी धरून खुलेआम व्यवसाय सुरू केला आहे. सदरील व्यवसाय आपल्याकडे रहावा यासाठी धडपड सुरू झाली आहे.

भोकर, (जि. नांदेड) ः शहरात आणि ग्रामीण भागात तंबाखू व रसायन मिश्रीत घातक गुटखा विक्रीला शासनाने बंदी आणली असता येथील काही व्यापारी संबंधीत अधिकाऱ्यांना हाताशी धरून खुलेआम व्यवसाय सुरू केला आहे. सदरील व्यवसाय आपल्याकडे रहावा यासाठी धडपड सुरू झाली आहे. अन्न व औषध प्रशासन मात्र याकडे बघ्याची भूमिका घेत आहेत. शुक्रवारी (ता.चार) येथील पोलिस उपअधीक्षकाच्या पथकाने छापा टाकून पंधरा हजारांचा गुटखा जप्त करून संबंधीत विभागाकडे कार्यवाहीसाठी सूपूर्त केला आहे.

हेही वाचा -  आहे त्या परिस्थितीत जगायला शिका, कोण म्हणाले ते वाचा...

शौकीनाचा चांगलाच हिरमोड
गेल्या अनेक वर्षांपासून रसायन मिश्रीत घातक गुटका विक्री जोमाने सुरू होती. व्यसनात गुरफटलेल्या व्यक्तीचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकजण गंभीर आजाराला बळी पडल्याने जीव गमवावा लागला आहे. शासनाने यावर उशीरा का होईना ऊत्पादन व विक्रीवर बंदी घातली आहे. आता शौकीनाचा चांगलाच हिरमोड झाला आहे. शौकीनांची भूक भागविण्यासाठी चाणाक्ष व्यापाऱ्यांनी चोरी छूपे पुन्हा चढ्या भावाने गुटखा विक्री सुरू केली. पोलिस आणि अन्य व औषधी विभागाच्या अधिकाऱ्यांना मुठीत ठेवून आपली चांदी करून घेतली आहे. सध्या शहर आणि परिसरात बहुतांशी ठिकाणी खुलेआम गुटखा विक्री सुरू आहे. शहरातील समतानगर, किनवट रस्ता, आंबेडकर चौक, सईदनगर, बायपास रस्ता परीसरात तस्कर सक्रिय झाले आहेत. यातुन मोठी आर्थिक कमाई होत असल्याने अनेक व्यापारी लालसावले आहेत. कोरोनाच्या काळात येथील तस्करांनी लाखो रुपयांची कमाई केली आहे. संबधीत विभाग मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने तस्करांना रान मोकळे झाले आहे.

तस्करीसाठी चढाओढ
गुटखा विक्रीतुन झटपट श्रीमंत होण्यासाठी चांगली संधी असल्याने शहरातील अनेक व्यापारी या व्यवसायात पाय रोवण्यासाठी सरसावले आहेत. व्यवसाय करण्यासाठी राजकीय वजन आणि ओळखीचा फायदा घेऊन मध्यस्थाकरवी जोरदार फिल्डींग लावली जाते आहे. अनेकजण धंद्याचा मुखीया मीच असावा म्हणून चढाओढ लागली आहे. यातूनच एकमेकांच्या छूप्या धंद्याच्या तक्रारी वाढत आहेत.

मुख्य तस्कर पोलिसांच्या ताब्यात 
शहरात तीन चार व्यापारी सदरील व्यवसायात चांगलेच गूंतले असुन शूक्रवारी येथील पोलीस ऊपअधिक्षक वीजय पवार यांनी मिळालेल्या गूप्त माहितीनुसार   मुख्य गूटका तस्कर शेख रज्जाक शेख हबीब राहणार समतानगर यांच्या गोदामाला छापा टाकून पंधरा हजाराचा गुटखा जप्त केला आहे यावेळी पोलीस कर्मचारी महेश जाधव .पुडंलीक लांडगे.संजय गीते याची उपस्थिती होती.सदरील माल व तस्करावर रितसर कार्यवाही करण्यासाठी अन्न व औषध विभागाकडे  अहवाल सादर करण्यात आला आहे. संबंधित विभाग काय कार्यवाही करणार याकडे लक्ष लागून आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fielding Of Traders For Gutkha Business, Nanded News