अखेर तामसा- नांदेड बस झाली सुरु; चालक, वाहकाचा सत्कार

प्रौढ नागरिक, शालेय विद्यार्थी, कर्मचारी, व्यापारी, शेतकरी, शेतमजूर व अन्य नागरिक यांना तामसा- नांदेड जाण्यासाठी महामंडळाची बस नसल्याने गेली कित्येक दिवस शारिरीक व मानसिक आणि आर्थिक त्रास होत होता.
तामसा- नांदेड बस सुरु
तामसा- नांदेड बस सुरु

नांदेड : कोवीडनंतर पहिल्यांदाच आलेल्या तामसा- नांदेड बसच्या चालक व वाहक यांचे तामसा बसस्थानकावर येथे सत्कार करण्यात आला. यावेळी राजुसिंग चौहान, देविदास रंगदळ, बालाजी डोणगावे, दयानंद चव्हाण, विजय कसेवाड यांची उपस्थिती होती.

प्रौढ नागरिक, शालेय विद्यार्थी, कर्मचारी, व्यापारी, शेतकरी, शेतमजूर व अन्य नागरिक यांना तामसा- नांदेड जाण्यासाठी महामंडळाची बस नसल्याने गेली कित्येक दिवस शारिरीक व मानसिक आणि आर्थिक त्रास होत होता. नागरिकांचे होणारे हाल लक्षात घेता राजुसिंग चौहान व देविदास रंगदळ यांनी जिल्हाधिकारी यांना तामसा- नांदेड महामंडळ बस सुरु करण्याची मागणी केली होती. याची तात्काळ दखल घेत गुरुवारी (ता. २४) हदगाव- तामसा- नांदेड बस फेऱ्या सुरु करण्यात आल्या.

हेही वाचा - थकबाकी वसुलीस गेलेल्या महावितरणच्या अभियंत्यास अर्धापूरात मारहाण

समाजातील तरुणांमध्ये निर्व्यसनी राहण्याबद्दल जागृती करणे. तामसा परिसरातील तरुणांसोबत गणेशखांडी पदयात्रेचे आयोजन, हजारो वृक्षांची लागवड,तामसा मॅराथॉन, सायकल स्पर्धा, डान्स स्पर्धा, सिंगिग स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, स्पर्धा परिक्षा आयोजन, कलावंताचा मेळावा, कोरोनाच्या लाॅकडाऊनमध्ये गरजूंना अन्नधान्य किटचे वाटप, शालेय विद्यार्थ्यांसाठी हास्य मेळावा, खड्डे चुकवा स्पर्धा ईत्यादी समाजोपयोगी उपक्रम राजुसिंग हे राबविता.

कोरोना या महाभयंकर साथीच्या रोगात खासगी वाहनधारक क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी व जादा दराने वाहून नेत जनतेचे आरोग्य धोक्यात घालून प्रवाशांना प्रवास करावा लागत होता. यावेळी प्रवाशांना आवाहन करताना राजुसिंग म्हणाले की, सर्वांनी महामंडळाच्या बसने सुरक्षित प्रवास करणे गरजेचे आहे. ही बस चालू राहीली तर आपल्या परिवारातील शिक्षण घेत असलेल्या मुली व वृध्द मोफत प्रवास करु शकतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com