esakal | रेमडेसिव्हर जादा दराने विकणाऱ्या चौघांना अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, सात इंजेक्शन जप्त 
sakal

बोलून बातमी शोधा

file Photo

रेमडिसिव्हर इंजेक्शनचा काळाबाजार होत असून मुळ किंमतीपेक्षा जास्त दराने विक्री होत असल्याची माहिती गौतम जैन यांनी बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात दिली

रेमडेसिव्हर जादा दराने विकणाऱ्या चौघांना अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, सात इंजेक्शन जप्त 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी अत्यावश्यक असलेल्या रेमडेसिव्हर इंजेक्शनाचा काळाबाजार करणाऱ्या शहरातील एका औषध विक्रेत्यासह चार जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुधवारी (ता. सात) दुपारी अटक केली आहे. त्यांच्याकडील ३६ हजार चारशे रुपयांची सात इंजेक्शन जप्त करण्यात आली आहेत. 

रेमडिसिव्हर इंजेक्शनचा काळाबाजार होत असून मुळ किंमतीपेक्षा जास्त दराने विक्री होत असल्याची माहिती गौतम जैन यांनी बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात दिली. मूळ इंजेक्शन पाच हजार चारशे रुपयांचे असून ते आठ हजारास विकत असल्याचे त्यांनी सांगितले. यावरून पोलिस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक व्दारकादास चिखलीकर यांनी सदर औषधाचा काळा बाजार करणाऱ्यांवर कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. 

हेही वाचा- नवरा कामावरून लवकर घरी येत नसल्याने विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

नातेवाईकाच्या मदतीने कारवाई 

त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक पी. डी. भारती, पोलिस नायक गंगाधर कदम, बालाजी तेलंग, पोलिस शिपाई गणेश धुमाळ यांचे पथक तयार केले. तसेच अन्न व औषध प्रशासन आणि स्थानिक गुन्हे शाखा यांच्याकडून समांतर शोध करुन सदर नातेवाईकाच्या मदतीने कारवाई केली. इंजेक्शनचा काळा बाजार करणारे विरभद्र संगाप्पा स्वामी (वय २६, रा. शिरुर ताजबंद, ता. अहमदपुर, जि. लातुर, हल्ली मुक्काम गोकुळनगर नांदेड), बाबाराव दिगांबर पडोळे (वय २५, व्यवसाय - हिन्दुस्थान मेडीकल वाजेगाव, रा. शिरुर, ता. उमरी, हल्ली मुक्काम विष्णुनगर, नांदेड), बालाजी भानुदास धोंडे (वय ३४, व्यवसाय - मेडीकल दुकान मनस्वी एजन्सी, संजीवनी हॉस्पीटल, रा. शेवडी ता. लोहा, हल्ली मुक्काम श्रीपादनगर, कौठा नांदेड), विश्वजीत दिगांबर कांबळे ऊर्फ बारडकर (वय ३६, व्यवसाय एम.आर., रा. बारड, ता. मुदखेड) यांना पकडले. 

हेही वाचा- नांदेडला तीन समन्वय अधिकाऱ्यांची रेमडेसिवीर इंजेक्शनच्या उपलब्धतेबाबत नियुक्ती

शिवाजीनगर भागात मिळुन आले

त्यांच्याकडुन एकुण सात इंजेक्शन (मुळ किंमत ३६ हजार चारशे रुपये) काळ्या बाजारात जास्त दराने विक्री करत असताना डॉक्टर लाईन शिवाजीनगर भागात मिळुन आले. सदरील कारवाई स्थानिक गुन्हे शाखा आणि अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त रोहित राठोड, औषध निरीक्षक माधव निमसे यांनी केली आहे. 
 

loading image