esakal | कंधार न्यायालय : देहविक्री करण्यासाठी मुलींना पळविणाऱ्या टोळीचा जामीन नाकारला
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

लोहा पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना अटक केली. सध्या या आरोपींताचा मुक्काम कारागृहात आहे. त्यांनी आपणास जामीन मिळावा म्हणून कंधार न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला. परंतु त्यांचा अर्ज न्यायलयाने फेटाळून लावला. 

कंधार न्यायालय : देहविक्री करण्यासाठी मुलींना पळविणाऱ्या टोळीचा जामीन नाकारला

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : लोहा शहरातून काही अल्पवयीन मुलींना वेगवेगळे आमिष दाखवून देहविक्री करण्यासाठी त्यांना परजिल्ह्यात विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाल्यानंतर या प्रकरणात काही आरोपींसह महिला दलालांविरुद्ध लोहा पोलिस ठाण्यात ता. १३ जूलै रोजी विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. लोहा पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना अटक केली. सध्या या आरोपींताचा मुक्काम कारागृहात आहे. त्यांनी आपणास जामीन मिळावा म्हणून कंधार न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला. परंतु त्यांचा अर्ज न्यायलयाने फेटाळून लावला. 

या बाबत अधिक माहिती अशी की, लोहा शहरातील एका अल्पवयीन मुलीला कुठलेतरी आमिष दाखवून पुणे येथे देहविक्री करण्यासाठी विकले. परंतु हा प्रकार उघडकीस आला. गरीब मुलींना हाताशी धरुन लोहा व नांदेड शहरातील काही दलालांनी पुणे व आदी ठिकाणी देहविक्री करण्यासाठी मुलींना पळवून नेऊन तिथे हे विकल्याचा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर पोलिस यंत्रणाही चक्रावून गेली. या प्रकरणात जिल्हा बालकल्याण समितीनेही लक्ष  घातले होते. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे, अॅड. सावित्री जोशी आणि त्यांच्या चमुने यात महत्त्वाची भुमिका बजावली होती. आरोपींना अटक करायचे काम पोलिसांचे असून त्या कामातसुध्दा या समितीने सहकार्य केले.  

हेही वाचा -  बापरे : नांदेड जिल्ह्यात कंटेनमेंट झोनची एवढी संख्या...?

कंधार न्यायालयाने फेटाळला जामिन अर्ज 

लोहा पोलीस ठाण्यात याप्रकरणी पीडीत मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आरोपीना पळता भूई थोडी झाली. पोलिसांनी यातील काही महिला आरोपी, पुरुषांनाअटक केली. कंधार न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडीत पाठविले. त्यानंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. हे सर्व आरोपी सध्या नांदेड कारागृहात स्थानबद्ध आहेत. यातील काही जणांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपणास जामीन मिळावा म्हणून कंधार न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. परंतु प्रकरणाचे गांभीर्य व पीडीतेचे वकिल अॅड. प्रीती खतगावकर (बेद्रे), अॅड. सॅमसन करकरे आणि सरकार पक्षाची वतीने अॅड. एम. कागने यांनी केलेला युक्तिवाद केला. यानंतर कंधार न्यायालयाचे न्यायाधीश यांनी यथायोग्य व न्यायास अभिप्रेत असा न्यायोचीत आदेश पारीत करुन आरोपी तान्ह्याबाई विमल जाधव, विमलबाई खंडू पाईकराव, महानंदा वाठोरे आणि संजय विजय मोरे यांचा जामीन अर्ज फेटाळला. 

लोहा पोलिसांची भुमिका महत्वाची

लोहा पोलिस ठाण्यात अपहरण, अत्याचार, फसवणुक, बाल लैंगीक अत्याचार प्रतिबंध यासह आदी कलमान्वये दाखल झआलेल्या गुन्ह्यात तत्परता दाखवत आरोपींना अटक केली. आरोपींना अटक केल्यानंतर हा धक्कादायक प्रकारउघडकीस आला. पोलिस निरीक्षक भागवत जायभाये आणि साहाय्यक पोलिस निरिक्षक श्री. करे यांनी यात लक्ष घालून सर्व आरोपींना अटक केली. त्यांनी यापूर्वीही असे गुन्हे केल्याची कबुली दिली. पीडीत मुलीच्या आईवर आरोपीनी प्रचंड दबाव आणला होता. 

loading image
go to top