esakal | बालिका खूनप्रकरण : भोकर बंदला विविध संघटनेचा पाठिंबा; पालकमंत्री अशोक चव्हाण कुटुंबाच्या भेटीला
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

शुक्रवारी (ता. २२) भोकर बंदची हाक देण्यात आली. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सदरील प्रकरण जलदगती न्यायालयात दाखल करुन आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी जोर धरु लागली आहे

बालिका खूनप्रकरण : भोकर बंदला विविध संघटनेचा पाठिंबा; पालकमंत्री अशोक चव्हाण कुटुंबाच्या भेटीला

sakal_logo
By
बाबूराव पाटील

भोकर ( जिल्हा नांदेड ) : तेलंगणा सिमेलगत असलेल्या दिवशी (बूद्रक ता. भोकर) येथे निरागस बालिकेवर अत्याचार करुन खून करण्यात आला. अशा निंदनीय घटनेचा विविध स्तरातून शहरात निषेध व्यक्त केला जात आहे. शुक्रवारी (ता. २२) भोकर बंदची हाक देण्यात आली. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सदरील प्रकरण जलदगती न्यायालयात दाखल करुन आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी जोर धरु लागली आहे.

भोकर तालूक्यातील दिवशी गावातील सालगडी बाबु संगेराव या विकृतबूध्दीच्या यूवकानी बूधवारी (ता. २०) पाच वर्षीय निरागस बालिकेवर अत्याचार करुन तिचा गळा आवळून खून केला होता. पोलिसानी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीला तात्काळ अटक केली आहे. दिवसेंदिवस समाजात माणूसकीला काळीमा फासणा-या घटनेच्या कक्षा रुंदावताना दिसून येते आहेत. सदरील प्रकरण शासनाने जलदगती न्यायालयात दाखल करुन विकृतबुध्दीच्या आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी परिणामी भविष्यात असे कृत्य करण्यास इतरांची हिंमत होणार नाही. अशी मागणी करुन निषेध व्यक्त केला आहे.

हेही वाचाधक्कादायक : पत्नीचा जाळुन खून करणाऱ्या पतीवर गुन्हा, वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथील घटना

सात दिवसाची पोलीस कोठडी

दिवशी येथील हत्या प्रकरणातील आरोपी बाबु ऊकंडु संगेराव यास येथील न्यायालयात गुरुवारी हजर केले असता न्यायालयाने सात दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. पीडीत बालिकेचे नांदेड येथे शवविच्छेदन झाल्यावर गुरुवारी (ता. २१) रात्री उशिरा दिवशी (ता. भोकर) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

बंदला प्रतिसाद

शुक्रवारी शहरात व्यापारी आणि नागरीकानी स्वंयस्फूर्तीने भोकर बंदला प्रतिसाद दिला आहे. बसेस, महाविद्यालय, शाळा, व्यापारी यांनी बंदमध्ये सहभाग घेतला होता. अत्यावश्यक असलेली आरोग्यसेवा, मेडिकल वगळता बंद शांततेत पार पडला आहे. शहरातील आंबेडकर चौकात अज्ञात जमावानी एका दूकानाची किरकोळ नासधूस केल्याने तणाव निर्माण झाला होता. सध्या शहरात शांतता असून पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता.

विविध संघटणेचा पाठिंबा

तालूका भाजपा महिला मुक्ती मोर्चाच्या विजया घिसेवाड, वंचीत बहूजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सुनिल कांबळे, केशव मुद्देवाड, बालाजी अनंतवाड, माणीक जाधव, भाजपाचे दिलीप सोनटक्के, गणेश पाटील बटाळकर, शिवसेना तालुकाप्रमुख अमोल पवार, माधव वडगावकर, बाजार समितीचे संचालक सतीष देशमुख, छावा संघटनेचे शंकर पाटील बोरगांवकर, तालुका संपर्कप्रमुख अनिल भोसले, मन्नेरवारलु समाजाचे तथा बाजार समितीचे संचालक रामचंद्र मुसळे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विश्वबंर पवार, जवाजोद्दीन बरबडेकर, डॉ. फेरोज इनामदार,आॅल इंडीया पॅथर संघटणेचे श्री. हंकारे, भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष मिलींद गायकवाड यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.

पालकमंत्र्याची दिवशीला भेट

सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी (ता. २२) दिवशी येथील पिडीत कुटुंबीयाची भेट घेऊन सांत्वन केले. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनीही भेट दिली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, सभापती जगदिश पाटील भोसीकर, मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश कौडगे, प्रवीण जेठेवाड यांनी पीडीत कुटुंबीयाची भेट घेऊन सांत्वन केले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे