Good News : शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा, निबंध सादर करण्याची 15 जानेवारीपर्यंत मुदत

प्रल्हाद कांबळे
Sunday, 13 December 2020

मंडळाकडे निबंध सादर करण्याची अंतिम तारीख 15 जानेवारी 2021 अशी आहे. राज्यातील माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे.

नांदेड : राज्यातील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांसाठी शिक्षण मंडळाने सन 2020-21 या वर्षाकरिता निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. मंडळाकडे निबंध सादर करण्याची अंतिम ता. 15 जानेवारी 2021 अशी आहे. राज्यातील माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे.

निबंध स्पर्धेसाठी तंत्रस्नेही शिक्षक-काळाची गरज, वाचनसमृद्धी- शिक्षकांसाठी अपरिहार्य, उपक्रमशीलता आणि शिक्षक, विद्यार्थी व शिक्षक- शरीर / मन: स्वास्थ्य, नवीन शैक्षणिक धोरण आणि माझी भूमिका हे पाच विषय देण्यात आली आहेत. राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांनी मुख्याध्यापक, प्राचार्यांमार्फत आपले निबंध मा. सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, भांबुर्डा, बालचित्रवाणी शेजारी शिवाजीनगर पुणे- 411004 किंवा विभागीय सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण विभागीय मंडळ या पत्त्यावर 15 जानेवारी 2021 अखेर पोहोचतील अशारितीने समक्ष सादर करावेत किंवा पोष्टाने पाठवावेत. पाकिटावर “माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा सन 2020-21” असा ठळक उल्लेख करावा.

हेही वाचा - पद्मविभूषण शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त व्हर्चुअल रॅलीला नांदेडमध्ये प्रचंड प्रतिसाद -

मंडळाकडे निबंध सादर करण्याची अंतिम तारीख 15 जानेवारी 2021 अशी आहे. यानंतर प्राप्त झालेले निबंध विचारात घेतले जाणार नाहीत. राज्यस्तरीय निबंध स्पर्धेसंबंधीचे हे निवेदन राज्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापकांनी सर्व शिक्षकांच्या निदर्शनास आणू दयावे तसेच त्यांना स्पर्धेत सहभागी होण्याकरिता प्रोत्साहित करावे, असेही आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good News: State Level Essay Competition for Teachers, Deadline for Submission of Essays till 15th January nanded news