
जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक- युवतींनी ऑनलाईन मार्गदर्शन सत्रामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.
नांदेड : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने जिल्ह्यातील युवक- युवतींसाठी “आरोग्य क्षेत्रातील रोजगाराच्या संधी व कौशल्य विकास योजना” या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन शुक्रवार (ता. २७ ) दुपारी 4 ते सायं 5 वाजेपर्यंत करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक- युवतींनी ऑनलाईन मार्गदर्शन सत्रामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.
हेही वाचा - उमरी : कौडगाव, येंडाळा, महाटी वाळू घाटावर कारवाई, १४ तराफे जाळले -
भारत जोडो युवा ॲकडमीचे तज्ज्ञ संस्थापक डॉ. बेलखोडे हे “आरोग्य क्षेत्रातील रोजगाराच्या संधी व कौशल्य विकास योजना” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या मार्गदर्शन सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी पुढील सूचनांचे पालन करावे. https://meet.google.com/tft-farj-qxd या लिंक वर क्लिक करावे. आपल्याकडे गुगल मीट अॅप यापूर्वी इनस्टॉल केला नसेल तर इनस्टॉल करुन घ्यावा.
आपण गुगल मीट अॅप मधून कनेक्ट झाल्यानंतर Ask to join वर क्लिक करावे. या सत्रात सहभागी होण्यासाठी 10 मिनिटे वेळेपूर्वी जॉईन करावे. दिलेल्या लिंकमधून कनेक्ट झाल्यावर लगेच आपला व्हिडिओ व माईक बंद करावा. सत्राच्या शेवटी काही प्रश्न विचारावयाचे असल्यास माईक सुरु करून विचारावे व लगेच माईक बंद करण्याची दक्षता घ्यावी. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड 02462-251674 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.