esakal | महिला कर्मचाऱ्यांना खूश खबर : शासकिय व निमशासकिय कार्यालयात लैगिंक तक्रार समिती
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

लैंगीक छळापासून अधिनियमानुसार प्रत्येक आस्थापनेत तक्रार समिती आवश्यक

महिला कर्मचाऱ्यांना खूश खबर : शासकिय व निमशासकिय कार्यालयात लैगिंक तक्रार समिती

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : ज्या आस्थापनेवर दहा किंवा त्यापेक्षा जास्त अधिकारी, कर्मचारी असतील अशा सर्व आस्थापनेमध्ये कार्यालयीन कामकाजाच्या महिलांचे लैगिंक छळापासून संरक्षण ( प्रतिबंध मनाई व निवारा) अधिनियम 2013 नुसार तक्रार समिती स्थापन करणे अनिवार्य आहे.

हा अधिनियम शासकीय, निमशासकीय खाजगी कार्यालये, संघटना, शासन अनुदानित संस्था, महामंडळे, आस्थापना, संस्था, शाखा ज्यांची शासनाने स्थापना केली असेल किंवा त्यांच्या नियंत्रणाखाली असेल किंवा पुर्णतः किंवा अंशत: प्रत्यक्ष निधी शासनामार्फत दिला जातो अशा कार्यालयासह पुढील आस्थापनेसाठीही हा अधिनियम लागू आहे.

सर्वच ठिकाणी ही समिती कार्यरत राहणार

खाजगी क्षेत्र, संघटना, इंटरप्रायजेस, अशासकीय संघटना, सोसायटी, ट्रस्ट, उत्पादक पुरवठा, वितरण व विक्री यासह वाणिज्य, व्यावसायिक, शैक्षणिक, करमणूक, औद्योगिक इत्यादी सेवा किंवा वित्तीय कामकाज पार पाडणारे युनिट किंवा सेवा पुरवठादार रुग्णालये, सुश्रुषालये, क्रिडा संस्था, प्रेक्षागृहे इ. ठिकाणी अंतर्गत कामाच्या ठिकाणी समिती गठीत करण्यात यावी. यापुर्वी समिती गठीत केलेली असेल, तरी समिती पुनर्गठीत करण्‍यात येऊन, त्‍याबाबतचा अहवाल, जिल्हा-अधिकारी (District-Officer) जिल्‍हाधिकारी कार्यालय,  नांदेड जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, नांदेड यांचे ई-मेल आयडी iccdwcdned@gmail.com वर पाठविण्‍यात यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

हेही वाचा -  कोरोना ब्रेकिंग - नांदेडला मंगळवारी १६२ पॉझिटिव्ह

जिल्ह्यातील 16 शासकीय व 5 खाजगी आयटीआयमध्ये प्रवेशाची कार्यवाही सुरु

नांदेड- जिल्ह्यातील सर्व 16 शासकीय व 5 खाजगी आयटीआयमध्ये ऑगस्टच्या प्रवेशसत्राच्या ऑनलाईन प्रवेशाची नोंदणी ता. एक ऑगस्टपासून सुरु करण्यात आलेली आहे. यात जिल्ह्यातील उमेदवारांसाठी 70 टक्के आणि इतर जिल्ह्यातील उमेदवारांसाठी 30 टक्के असा बदल झालेला आहे. त्यामुळे कोणत्याही उमेदवारास सर्व आयटीआयतील कोणत्याही व्यवसायास पसंतीक्रम देता येणार आहे.

जिल्ह्यातील प्रवेश उमेदवारांसाठी 70 टक्के व इतर जिल्ह्यातील उमेदवारांसाठी 30 टक्के असा बदल झालेला आहे. त्यामुळे कोणत्याही उमेदवारास सर्व आयटीआयतील कोणत्याही व्यवसायास पसंतीक्रम देता येणार आहे.  नांदेड या संस्थेत प्रवेशसत्र ऑगस्टच्या सत्रात सर्वसाधारण संवर्गासाठी 20 व्यवसायामध्ये 548 जागा, महिलांसाठी 2 व्यवसायामध्ये सर्वसाधारण 64 जागा व अल्पसंख्याक संवर्गातील उमेदवारांसाठी 5 व्यवसायामध्ये 112 जागा उपलब्ध आहेत.

खालील संकेत स्थळावर उपलब्ध 

अल्पसंख्यांक संवर्गातील मुस्लीम, नवबौध्द, शिख, पारशी व जैन इत्यादी उमेदवारांना कळविण्यात येते की, आयटीआय नांदेड येथे ऑगस्टच्या प्रवेश सत्रासाठी अल्पसंख्यांक संवर्गातील उमेदवारांकरिता आरेखक स्थापत्य (D,man, Civil )-24 , जोडारी (फिटर)-20, मेसन(Mason)-24, ट्रॅक्टर मेकॅनिक (Mechanic Tractor)-20 , टूल ॲन्ड डायमेकर (Tool and Die Maker) अशा प्रकारे पाच व्यवसायामध्ये 112 जागा उपलब्ध आहेत. सदरील प्रवेश प्रक्रिया ही विविध फेऱ्यामध्ये पार पडणार आहे. प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने होत असून या प्रवेशाकरिता इच्छूक उमेदवारांनी ऑनलाईन प्रवेश नोंदणी व माहितीसाठी http://admission.dvet.gov.in  या संकेतस्थळावर भेट द्यावी.