esakal | Gram Panchayat Election : मी सरपंच होणार, गावचा विकास करण्याच्या ठाम निर्धाराने नारी शक्ती प्रचारात
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

मी सरपंच होणार, गावचा विकास करणार या निर्धाराने गावाच्या भावी सरपंच म्हणून महिला उमेदवार प्रचार करित आहेत. गावातील घरोघरी जावून आपल्या पॅनलची भुमिका मांडत आहेत.

Gram Panchayat Election : मी सरपंच होणार, गावचा विकास करण्याच्या ठाम निर्धाराने नारी शक्ती प्रचारात

sakal_logo
By
लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : ग्रामपंचायत निवडणूकीच्या प्राचारात नारी शक्ती उतरली आहे. मी सरपंच होणार, गावचा विकास करणार या निर्धाराने गावाच्या भावी सरपंच म्हणून महिला उमेदवार प्रचार करित आहेत. गावातील घरोघरी जावून आपल्या पॅनलची भुमिका मांडत आहेत. स्थानिक स्वराज संस्थेत महीलांना पन्नास टक्के आरक्षण आहे. पण ग्रामपंचायतीमध्ये विषम संख्या असल्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक महिला सदस्य जास्त राहणार आहे.तर सरपंच पदाच्या आरक्षणात काही बिघाडी होवू नये म्हणुन जास्तीत जास्त महिला उमेदवार देण्यावर पॅनल प्रमुखाचा भर दिला आहे.

चुल आणि मुल असे म्हणण्याचे दिवस आता निघून गेले आहेत. सर्वच क्षेत्रात महिला आपला ठसा उमटवत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था ह्या ग्रामविकासात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. या संस्था आपल्याच ताब्यात रहाव्यात यासाठी प्रत्येक पॅनलप्रमुख सरसावले आहेत.

ग्रामीण भागातील प्रचार शिगेला पोहंचला 

निवडणूक प्रचारासाठी काही मोजकेच दिवस आसल्यामुळे ग्रामीण भागातील प्रचार शिगेला पोहंचला आहे. महिलांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. आपल्या पॅनलचा जाहिरनामा प्रत्येक मतदारांसमोर ठेवणे, निशाणी सांगणे, भाविष्यात राबविण्यात येणा-या विविध विकास योजना समजावून सांगणे आदी प्रचार महिला करित आहेत.

तालुक्यात ४६ ग्रामपंचायतीपैकी २३ ग्रामपंचायतीमध्ये  महिला सरपंच राहणार 

तालुक्यात ४६ ग्रामपंचायतीपैकी २३ ग्रामपंचायतीमध्ये  महिला सरपंच राहणार आहेत. तसेच चार ते पाच गावात महिलांच्या हातात तडजोडीतून गावचा कारभार जावू शकतो. त्यादृष्टीने आरक्षणापेक्षा जास्त महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. काही गावात तर सर्व महिला उमेदवार बिनविरोध निवडूण आल्या आहेत. तसेच बिनविरोध निवडूण येण्यात महिला उमेदवार आघाडीवर आहेत. महिला उमेदवारांना महिला मतदारांशी संवाद साधून त्यांच्या समस्या सोडणे सोपे जाते. यासाठी महिला उमेदवार हिरिरीने प्रचार करतांना दिसून येत आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

loading image
go to top