Gram Panchayat Election:साहेबांचे लक्ष्मी दर्शन ठरतेय स्थानिक पदाधिकाऱ्यांना डोकेदुखी

प्रल्हाद कांबळे | Sunday, 10 January 2021

निवडणूक कोणतीही असो यात साम- दाम- दंड भेद नितीचा वापर प्रत्येक पक्ष करित असतो. यात सध्या दामाला विशेष असे महत्व आले आहे.

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : ग्रामीण भागातील राजकारण ग्रामपंचायत निवडणुकीत गरम झाले आहे. जसजशी निवडणूक जवळ येत आहे तसतसे प्रचारात नविन फंडे, मतदारांच्या मागण्या पुढे येत आहेत. अलीकडच्या निवडणुकीत मतदारांना लक्ष्मी दर्शन झाल्याने ग्रामपंचायत निवडणूकीत लक्ष्मी दर्शन होण्याच्या प्रतिक्षेत मतदार आहेत. काही अपवाद वगळता गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात मतदारांना लक्ष्मी दर्शन झाले होते. हेच लक्ष्मी दर्शन मात्र प्रत्येक पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना चांगलेच डोके दूखी ठरतेय. या निवडणुकीत साहेब चार हात दुर दुरच आहेत. कार्यकर्ते मात्र जमापुंजी पदरमोड करुन किल्ला लढत आहेत.

निवडणूक कोणतीही असो यात साम- दाम- दंड भेद नितीचा वापर प्रत्येक पक्ष करित असतो. यात सध्या दामाला विशेष असे महत्व आले आहे. ज्या ठिकाणी तूल्यबळ लढत असते अशा लढतीत प्रत्येक उमेदवार आपण कशात कमी पडणार नाही याकडे लक्ष देतो. हेच चित्र सध्या तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत दिसून येत आहे.

हेही वाचाआष्टी पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता

Advertising
Advertising

विकास कामे, उमेदवार, विचाराधारा याला थारा राहिला नाही

निवडणूक जितकी कमी मतदात होते तिथे स्पर्धा वाढत जाते. अलीकडच्या काळातील ग्रामपंचायत, जिल्हा परिषद विधानसभा, लोकसभा आदी निवडणुकांच्या प्रचाराचे तंत्र बदलले आहे. विकास कामे, उमेदवार, विचाराधारा याला थारा राहिला नाही. मतदारांना विविध प्रलोभने आमिष दाखवून मतदानाचे दान आपल्या पदरात कसे पडेल याकडे भर देण्यात येत आहे. साहेबांच्या निवडणुकीत स्थानिक पदाधिका-यांनी वरुन आलेली रसद मतदारांपर्यंत पोहंचविली होती. तेच पदाधिकारी आता ग्रामपंचायत निवडणूक लढवत आहेत. हे पदाधिकारी जेव्हा मतदारांसमोर मत मागण्यासाठी जात आहेत तेव्हा त्यांना खूप मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. साहेबांच्या निवडणुकीत वरुन रसद आली होती आता काही नियोजन आहे का नाही असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

येथे क्लिक करा - काय म्हणता ? शहरालगत गोदावरीचे 30 टक्के पाणी प्रदूषित

कार्यकर्ते मात्र साहेबांच्या रसदीशिवाय किल्ला लढत आहेत

काही ठिकाणी एकाच पक्षाचे स्थानिक गट एकमेकांच्याविरुद्ध लढत आहेत. दोघेही साहेबांचे समर्थक. तसेच काही गावात सर्व पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचे एकत्र पॅनल आहे. अशा परिस्थितीत साहेबांनी कोणाला मदत करावी. प्रत्येक पक्षातील साहेबांना सर्वच पदाधिकाऱ्यांची  गरज असते. अशावेळी कोणाला मदत करावी कोणाची बाजू घ्यावी असा प्रश्न साहेबांना पडतो. त्यामुळे सध्या तरी साहेब ग्रामपंचायत निवडणूकीपासून काहीसे दुर काहीसे जवळ आहेत. कार्यकर्ते मात्र साहेबांच्या रसदीशिवाय किल्ला लढत आहेत.

नांदेड जिल्ह्याच्या इतर घटना घडामोडीसाठी येथे क्लिक करा 

संपादन- प्रल्हाद कांबळे