ग्रामपंचायत निवडणूकीची हदगांवमध्ये धुम ! मोठ्या गावाकडे नेत्यांचे लक्ष; गाव पुढाऱ्यांची चलती

file photo
file photo

निवघाबाजार ( जिल्हा नांदेड) : हदगाव तालुक्यात १०८ ग्रामपंचायती निवडणूका पैकी १३ गावच्या ग्रामपंचायती बिनविरोध झालेल्या आहेत. विशेष म्हणजे संरपचपदाच्या आरक्षणचा घोळ कायम असुन ग्राम पंचायत सदस्यांच्या निवडणूकीनंतर ' सरपंच पदाच 'आरक्षण काढले जाणार आहे. यामुळे सरपंच कोण होणार ही सध्या तरी डोकेदुखी दिसून येत आहे. तालुक्याच्या अनेक गावामधुन विविध पक्षाचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी आता गावात येत असुन जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांच्या गावातील ग्रामपंचायत निवडणूकीकडे लक्ष लागले आहे. यामध्ये आता लोकप्रतिनिधी राजकीय पदाधिकाऱ्यांची कस लागणार आहे. 

तालुक्यातील तामसा, निवघा, तळणी, वाळकी (खुर्द) आष्टी, वायपना, पाथरड, हडसणी, शिबदरा, पिंपरखेड, पळसा, डोंगरगाव (कवठा ) अंबाळा, बनचिंचोली, ल्याहारी येथील निवडणूकीकडे  सर्वांचे लक्ष आहे. गावात कुणाचे पॅनेल विजयी होणार या बाबतीत गावगप्पा जोमात आहेत. आणखीन विशेष म्हणजे काही प्रस्थापितांविरुद्ध युवकांनी विरोधात दंड थोपटले असून त्यामुळे गावपुढाऱ्यांच प्रतिष्ठापणाला लावत आहे. या निवडणूकीत ग्रामपंचायतीचे समिकरण बदलतील असा राजकीय अंदाज अनेक गावातील गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे. तर काही गावपुढाऱ्यांनी या निवडणूकीकडे लक्ष देणार नसल्याचे सांगितले तरी शहरात येवुन गावातील निवडणूकीचे सुञ हे गावपुढारी हलवत आहेत. तर काही उमेदवारांना रसद पोहचवली जात आहे. त्यामुळे विविध गावाच्या ग्रा. पं. निवडणूका रंगतदार ठरणार आहेत.

माजी केंद्रीय मंत्री, माजी खासदार व माजी आमदारांच्या गावच्या निवडणूका बिनविरोध नाहीत

हदगांव तालुक्यातील वायफना, ल्याहरी, आष्टी हे गाव माजी केंद्रीयमंञी सूर्यकान्ता पाटील, माजी खासदार सुभाष वानखेडे, माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर या दिग्गज नेत्यांच्या व लोकप्रतिनिधींच्या गावात पण निवडणूका होणार आहेत. विशेष म्हणजे ह्या दिग्गज नेत्यांनी ह्या ग्राम पंचायत निवडणूका मध्ये किंचितही भाग किंवा बिनविरोध निवडणूका करा म्हणून सांगितले नसल्याचे दिसुन येत आहे. थोडे जरी या दिग्गज नेत्यांनी बिनविरोध बाबतीत गावकऱ्यांना आवाहन केले असते तर तालुक्यातील बहुतांशी ग्रा. पं. निवडणूका बिनविरोध झाल्या असत्या व निवडणूक प्रशासनाचा ताण निश्चितच कमी झाला असता.

संपादन-  प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com