मराठवाड्यातील ऐतिहासिक धम्म चळवळीचे मोठे श्रध्दास्थान- जिल्हाधिकारी डाॅ. विपीन

प्रल्हाद कांबळे
Sunday, 30 August 2020

खूरगाव नांदूसा येथील श्रामनेर प्रशिक्षण केंद्राच्या नामफलकाचे उद्घाटन

नांदेड -ऋषीपठन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने खुरगाव नांदुसा येथे श्रामनेर संस्कार प्रशिक्षण केंद्राच्या नामफलकाचे उद्घाटन, भदंत निवास व गाडी पार्किंगच्या फलकाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते शनिवार (ता. 29) रोजी झाले.

या कार्यक्रमाला नांदेड वाघाळा महापालिकेचे आयुक्त सुनिल लहाने, उपजिल्हाधिकारी गौरव इंगोले, सरपंच शिवमाला लेंढाळे, ग्राम सदस्य देवानंद नरवाडे, श्रामनेर प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख भदंन पय्याबोधी यांची उपस्थिती होती.उद्घाटनानंतर जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या हस्ते श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी 160 वृक्षांची लागवड करण्यात आली.

हेही वाचाराष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अजून भक्कम करणार- कोण म्हणाले ते वाचा? -

भदंत पय्याबोधी थेरो यांनी 55 गुंठे परिसरातील या जमीनीवर नियोजन भव्य बुध्द विहार

श्रामनेर प्रशिक्षण केंद्राचे संस्थापक अध्यक्ष भदंत पय्याबोधी थेरो, भिक्खु मेतानंद, भिक्खु संघरत्न, भदंत धम्म शिलो, भदंत चंद्रमणी, भदंत धम्म किर्ती, भदंत सुदर्शन, भदंत सुभद्र इत्यादींनी आशीर्वाद गाथा अनुसरली. भदंत पय्याबोधी थेरो यांनी 55 गुंठे परिसरातील या जमीनीवर नियोजन भव्य बुध्द विहार आणि श्रामनेर प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा संकल्प केला आहे.

येथे क्लिक करा - नांदेड : वर्षावासानिमित्त महाविहार बावरीनगर येथे श्रामणेर प्रशिक्षण शिबीर -

मराठवाड्यातील ऐतिहासिक धम्म चळवळीचे मोठे श्रध्दास्थान

मराठवाड्यातील ऐतिहासिक धम्म चळवळीचे मोठे श्रध्दास्थान म्हणून खुरगाव ओळखले जाईल असे ते म्हणाले.या कार्यक्रमाला प्रतिष्ठीत नागरिक मल्लीकार्जून अप्पा, नारायण अप्पा, साहेबराव इंगोले, प्रा.एच.एच.इंगोले, प्रा.विनायक लोणे, विलास वाठोरे, मुरलीधर पाईकराव, रोहिदास भगत, नागोराव नरवाडे, अप्पाराव नरवाडे, रवि नरवाडे, कृष्णा नरवाडे, राजरत्न नरवाडे, अनिल नरवाडे, साहेबराव नरवाडे, वामन नरवाडे, रामजी नरवाडे, सिध्दार्थ नरवाडे, अप्पाराव नरवाडे, जयप्रकाश नरवाडे, संजय नरवाडे आदिंची उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन साहेबराव इंगोले यांनी केले तर आभार भदंत पय्याबोधी थेरो यांनी मानले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Great place of worship of historical Dhamma movement in Marathwada Collector Dr. Vipin nanded news