esakal | अर्धापूर सोसायटी मतदार संघातून काॅग्रेसचे बाबुराव कोंढेकर यांना उमेदवारीसाठी ग्रिन सिग्नल..
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

तालुक्यात 24 मतदार असून बाबुराव कदम यांनी मतदारांशी संपर्क करुन प्रचार सुरु केला आहे. तर भाजपाचे डॉ. लक्ष्मण इंगोले यांची उमेदवारी निश्चित आहे.

अर्धापूर सोसायटी मतदार संघातून काॅग्रेसचे बाबुराव कोंढेकर यांना उमेदवारीसाठी ग्रिन सिग्नल..

sakal_logo
By
लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक प्रक्रिया सुरु असून मंगळवारी (ता. 23) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असून निवडणूकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. अर्धापूर तालुका सोसायटी मतदार संघातून काॅग्रेसचे माजी सभापती बाबुराव कोंढेकर यांची उमेदवारी निश्चित मानली जात असून पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी ग्रिन सिग्नल दिला आहे. तालुक्यात 24 मतदार असून बाबुराव कदम यांनी मतदारांशी संपर्क करुन प्रचार सुरु केला आहे. तर भाजपाचे डॉ. लक्ष्मण इंगोले यांची उमेदवारी निश्चित आहे.

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणूकीसाठी अर्धापूर तालुका सोसायटी मतदार संघातून पाच उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते.यात काॅग्रेसचे बाबुराव कोंढेकर, प्रवीण देशमुख, राजेश मुळे, भाजपचे डॉ. लक्ष्मण इंगोले, शिवसेनेचे लक्ष्मण देबगुंडे यांचा समावेश होता. उमेदवारी अर्जाच्या छानणीत लक्ष्मण देबगुंडे यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरला आहे.

हेही वाचा - नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी वाढली; आयजीनी लक्ष देण्याची गरज 

जिल्हा पातळीवर महाविकास आघाडी होते की स्वतंत्र निवडणूक लढवली जाते की निवडणूक बिनविरोध होते हे मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीसाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जय्यत तयारी केली आहे. जिल्हातील  काॅग्रेसच्या संभाव्य उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी काही दिवसापुर्वी नांदेड येथे बैठक घेवून उमेदवारांचे व पदाधिका-यांचे मत जाणून घेतले.

अर्धापूर तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी आध्यक्ष बाबुराव कोंढेकर व भाऊरावचे संचालक प्रविण देशमुख यांना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सांगितले होते. तसेच काॅग्रेसचे राजेश्वर मुळे यांनीही अर्ज दाखल केला आहे. तालुक्यातील सामाजिक समिकरण लक्षात घेवून बाबुराव कोंढेकर यांच्या उमेदवारीला पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी ग्रिन सिग्नल दिला असल्याची विश्वसनिय सुत्राकडून माहिती मिळाली आहे. तसेच श्री कदम यांनी प्रचार ही सुरु केला आहे.

ही निवडणूक खासदार प्रताप पाटील चिखलीकर व पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या पॅनलमध्ये होणार आहे. या दोन्ही मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पनणाला लागली आहे. निवडणूक झाली तर भाजपाच्या वतीने डाॅ लक्ष्मण इंगोले यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

loading image
go to top