esakal | शुभेच्छा संदेशाने रक्ताची गरज भरुन निघणार नाही; रक्तादनासाठी तरुणांने पुढे यावे
sakal

बोलून बातमी शोधा

blood donation

शुभेच्छा संदेशाने रक्ताची गरज भरुन निघणार नाही; रक्तादनासाठी तरुणांने पुढे यावे

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : मानवी शरिरात तयार होणारे रक्त बाजारात पैशाने विकत मिळत नाही. रक्त वेळेवर न मिळाल्याने अनेक रुग्णांचा मृत्यू होतो. हे सर्वांना ठावूक आहे. एका व्यक्तीस वर्षभरात किमान चार वेळेस सहज रक्तदान करता येते. सोमवार (ता. १४) जागतीक रक्तदान दिन साजरा करण्यात आला. परंतू जागतीक रक्तदान दिनाच्या दिवशी देखील अनेक सुज्ञ नागरीकांना रक्तदान करण्यासाठी आवाहन करावे लागले. रक्तदानाचे महत्व आज नाही कळले, तर मग कळणार कधी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शहरात गुरु गोविंदसिंघजी ब्लड बँक, नांदेड ब्लड बँक, श्रीहजूर साहेब ब्लड बँक, इंडियन रेडक्रॉस ब्लड बँक, अर्पन ब्लड बँक, गोळवळकर ब्लड बँक व अर्पना ब्लड बँक या आठ ब्लड बँकाशिवाय विष्णुपूरी शासकीय रुग्णालयातील शासकीय रक्तपेढी अशा नऊ बँका आहेत. पूर्वी ह्या ब्लड बँका साध्या दोन तीन खोल्यात कारभार चालवत असत. आता शहरातील बहुतेक ब्लड बँकांचा अत्याधुनिक विस्तार झाला आहे. परंतु बँकस्तरावर देखील रक्तदान करण्यासाठी म्हणावी तशी जनजागृती केली जात नाही. त्यामुळे नागरीकांमध्ये रक्तदान करण्याबद्दल अनेक गैरसमज आहेत. ब्लड बँकांना मोठ्या प्रमाणावर रक्त संकलन करण्यासाठी राजकीय नेत्यांच्या वाढदिवसाची वाट बघावी लागते. आज एखाद्या गरजवंतास रक्ताची आवश्‍यकता भासल्यास त्या बदल्यात त्याच्या नातेवाईकास रक्तदान केल्याशिवाय रक्त मिळत नाही.

हेही वाचा - नाशिक जिल्ह्यातील प्रकार; या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे

जागतीक रक्तदान दिनाच्या एकमेकांना शुभेच्छा देऊन रक्तसंकलन होणार नाही. त्यामुळे सुज्ञ नागरीकांनी शुभेच्छा देण्याबरोबरच स्वेच्छेने रक्तदान केल्यास त्याचा गरजवंत रुग्णास चांगला फायदा होऊ शकतो. मात्र आज मोबाईलच्या इंटरनेटमध्ये गुंतलेले नागरीक रक्तदान करण्याऐवजी सोशल मीडियातुन शुभेच्छा देऊन मोकळे होता. परंतु त्याने रक्ताचा तुटवडा भरुन निघणार नाही. असे अनेक तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे. त्यासाठी युवकांनी रक्तदान करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे.

अशी आहे ब्लड बँकांची आजची स्थिती ः

श्री हूजूर साहिब ब्लड बँकेनी मागील दिड वर्षाच्या काळात- दहा हजार ८७३ पिशव्या रक्त संकलन. सध्या या बँकेकडे ‘ए’ पॉझिटिव्ह- सात, ‘बी’ पॉझिटिव्ह- २०, ओ पॉझिटिव्ह- ३० व ए निगेटिव्ह- दोन अशा ५९ रक्तपिशवी उपलब्ध आहेत. तर ए- बी पॉझिटिव्ह, बी- निगेटिव्ह, ओ- निगेटिव्ह, ए-बी- निगेटिव्ह या रक्तगटाची एकही रक्तपिशवी शिल्लक नाही.

जीवन आधार ब्लड बँक - ‘ए’ पॉझिटिव्ह- ७३, ‘बी’ पॉझिटिव्ह- ७१, ‘ओ’ पॉझिटिव्ह- २० व‘ए-बी’ पॉझिटिव्ह- ९२, ‘ए’ निगेटिव्ह-दोन, ‘बी’ निगेटिव्ह-एक, ‘ए-ब३’ निगेटिव्ह- दोन अशा २६१ रक्त पिशव्या शिल्लक आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image