पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले विविध कुटुंबाचे सांत्वन

शहरासह तालुक्यातील सामाजिक व काॅग्रेसच्या पदाधिकारी व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे गेल्या दोन महिण्यात कोरोनासह ईतर आजारामुळे निधन झाले होते. या कुटूंबांचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांत्वन केले.
अशोक चव्हाणकडून अनेक कुटुंबाचे सांत्वन
अशोक चव्हाणकडून अनेक कुटुंबाचे सांत्वन

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : शहरासह तालुक्यातील विविध कुटुंबांना भेट देवून पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी बुधवारी (ता. 16 ) सांत्वन करुन आस्तेवाईकपणे चौकशी केली. त्यांच्या सोबत माजी मंत्री डी. पी. सावंत, गोविंदराव शिंदे नागेलीकर आदी उपस्थित होते.

शहरासह तालुक्यातील सामाजिक व काॅग्रेसच्या पदाधिकारी व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे गेल्या दोन महिण्यात कोरोनासह ईतर आजारामुळे निधन झाले होते.या कुटूंबांचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांत्वन केले. शेणी येथील मराठा सेवा संघाचे प्रा. गणेश शिंदे, रावण होणाजी पाटील, उमाजी राजारामजी शिंदे, रमेश माहादजी बोबडे यांचे निधन झाले या चारही कुटूंबाला पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी भेट देवुन कुटुंबाचे सांत्वन केले. यावेळी श्यामराव पाटील टेकाळे, आनंद पाटील धुमाळ, दादराव पाटील, शंकरराव शिंदे, डाॅ. आनंद शिंदे, बाळू पाटील, सचिन शिंदे आदी उपस्थित होते.

हेही वाचा - बॉलिवूडमधील ग्लॅमरस अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.

शहरातील माजी नगराध्यक्षा रेखा अवघुतराव काकडे, माजी सरपंच गोविंद सिनगारे यांच्या पत्नी मणिषा गोविंद सिनगारे, काॅग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी काजी सल्लाउद्दिन, नगरसेवक मुसबीर खतीब यांचे वडील अब्दुल खय्युम खतीब यांचे निधन झाले. या कुटूंबाला भेट देवुन आस्थेवाईकपणे चौकशी केली. यावेळी माजी सरपंच गोविंद सिनगारे, राज काकडे, मुसबीर खतीब, गाजी काजी, नासेर खतीब, पप्पु पाटील, तालुका आध्यक्ष बालाजी गव्हाने, शहराध्यक्ष राजु शेटे, उपविभागीय अधिकारी लतीफ पठान, तहसीलदार सुजित नरहरे, मुख्याधिकारी मारोतराव जगताप, शेख लायक ,डाॅ. विशाल लंगडे, प्रवीण देशमुख, व्यंकटराव कल्याणकर, पप्पु बेग, पंडितराव लंगडे, सोनाजी सरोदे, व्यंकटी राऊत, व्यंकटी साखरे, मनसब पठान, इम्राण सिद्दीकी, मुक्तेदर पठान, छत्रपती कानोडे, आमोल डोंगरे, चंद्रमुणी लोणे, दत्त नादरे,संजय गोविंद, कामाजी आटकोरे, शंकर ढगे, राजाराम पवार आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com