esakal | पालकमंत्री अशोक चव्हाणांच्या अर्धापूर नगरपंचायतमध्ये तळीरामांचा अड्डा
sakal

बोलून बातमी शोधा

अर्धापूर नगरपंचायत

पालकमंत्री अशोक चव्हाणांच्या अर्धापूर नगरपंचायत बनली तळीरामांचा अड्डा

sakal_logo
By
लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मतदार संघातील अर्धापूर नगरपंचायत सध्या तळीरामांचा अड्डा झाली आहे. कार्यालयाच्या छतावर रिकाम्या बाटल्या, पाणीपाॅच, प्लास्टिक ग्लास याचा खच पडला आहे. या गंभीर बाबीकडे नगरपंचायत प्रशासानाचे दुर्लक्ष होत आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून नगरपंचायतचे विरोधी पक्ष नेते अॅड. किशोर देशमुख यांनी तीव्र शब्दात प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे.

अर्धापूर नगरपंचायत पालकमंत्री अशोक चव्हाण याच्या मतदारसंघात आहे. या नगरपंचायतीमध्ये काॅग्रेसला बहुमत आहे. ही नगरपंचायत या न त्या कारनामुळे जिल्ह्यात सतत चर्चेत असते. सध्या भलत्याच कारणामुळे चर्चेत आहे.

हेही वाचा - बजाज फाईनान्सच्या बनावट कॉल सेंटरवर छापा; नांदेड पोलिसांची ठाणे शहरात कारवाई

नगरपंचायत शहरात स्वच्छता अभियान राबत आहे. मात्र नगरपंचायतीच्या छतावरच रिकाम्या दारुच्या बाटल्या, पाणी पाॅच, प्लास्टिकचे ग्लास याचा खच पडला आहे. नगरपंचायतीच्या परिसरात देशी दारुचे दुकान आहे. कार्यालय बंद झाल्यावर छतावर जाऊन तळीराम मनसोक्त मद्य ढोसतात. या तळीरामांचा बंदोबस्त करण्यात नगरपंचायत अधिकारी हतबल झाले आहेत. ही गंभीर बाबीकडे विरोधी पक्षनेते अॅड. किशोर देशमुख यांनी लक्ष वेधले असून समाज माध्यमातून छायाचित्रे प्रसारित केले आहेत.

येथे क्लिक करा - ज्या ऍपवरुन हा गंडा घालण्यात आला आहे त्यामध्ये गुंतवणूक केल्यास जबरदस्त रिटर्न्स मिळण्याचं आमिष दाखवण्यात आलं होतं.

नगरपंचायत प्रशासनाचे या गंभीर बाबीकडे लक्ष नाही. नगरपंचायतीच्या दुस-या मजल्यावर बांधकाम विभागाचे कार्यालय असून या कार्यलयाच्या परिसारातील छताच्या मोकळ्या जागेत रिकाम्या बाटल्यांचा खच पडला आहे. शहरात स्वच्छता अभियान राबविणा-या अधिका-यांनी आधी कार्यालयात काय होत आहे याकडे लक्ष घालावे अशी प्रतिक्रिया अॅड. किशोर देशमुख यांनी दिली.

संपादन- प्रल्हाद कांबळे