आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांच्या मदतीसाठी माणुसकी धावली

सोमवार, 29 जून 2020

देळूब येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी अंगुलिमाल नरवाडे या शेतकऱ्याचे कुटुंब अडचणीत होते. त्यांच्या कुटुंबात श्रीमती पुष्षाबाई अंगुलिमाल नरवाडे व पाच मुली आहेत, तर एका मुलीचे लग्न झाले आहे. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने शेताची पेरणी कशी करावी, या चिंतेत नरवाडे कुटुंब होते. या कुटुंबाची माहिती मिळताच शेतकऱ्याच्या शेतात भारतीय युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ॲड. किशोर देशमुख यांच्या पुढाकाराने त्याच गावातील भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते अनिल बाचेवार यांनी शेतकरी महिला श्रीमती पुष्षाबाई अंगुलिमाल नरवाडे यांच्या शेतात स्वतः सोयाबीन व खत विकत आणून ट्रॅक्टरद्वारे पेरणी करून दिली. 

अर्धापूर, (जि. नांदेड) ः देळूब बुद्रक येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी अंगुलीमाल उत्तम नरवाडे या शेतकऱ्यांनी सततच्या नापिकीला कंटाळून आत्महत्या केली होती. सदरील कुटुंबाची पेरणीची अडचण लक्ष्यात घेऊन नांदेड जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने पेरणीसाठी बियाणे तसेच ट्रॅक्टर भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष ॲड. किशोर देशमुख यांनी स्वतः ट्रॅक्टर चालऊन पेरणी करून देण्यात आली.

हेही वाचा  धक्कादायक : नांदेड परिसरात १४ गोवंश मृतावस्थेत आढळले, सर्वत्र संताप -

ट्रॅक्टरद्वारे पेरणी 
देळूब येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी अंगुलिमाल नरवाडे या शेतकऱ्याचे कुटुंब अडचणीत होते. त्यांच्या कुटुंबात श्रीमती पुष्षाबाई अंगुलिमाल नरवाडे व पाच मुली आहेत, तर एका मुलीचे लग्न झाले आहे. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने शेताची पेरणी कशी करावी, या चिंतेत नरवाडे कुटुंब होते. या कुटुंबाची माहिती मिळताच शेतकऱ्याच्या शेतात भारतीय युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ॲड. किशोर देशमुख यांच्या पुढाकाराने त्याच गावातील भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते अनिल बाचेवार यांनी शेतकरी महिला श्रीमती पुष्षाबाई अंगुलिमाल नरवाडे यांच्या शेतात स्वतः सोयाबीन व खत विकत आणून ट्रॅक्टरद्वारे पेरणी करून दिली. 

इतरांनी याकामी पुढाकार घ्यावा
भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आलेली ही मदत कमी असली तरी त्यांना हिंमत देणे हा आहे. प्रत्येक गावात इतरांनी याकामी पुढाकार घ्यावा, अशी भावना आहे. तसेच संजय गांधी निराधार योजनेत सदर शेतकरी बघिणीचा समावेश करून शासनाने मदत करावी, अशी मागणी ॲड. किशोर देशमुख यांनी यावेळी केली. या वेळी ॲड. किशोर देशमुख, अनिल बाचेवार, माजी सभापती बाबूराव हेंद्रे, युवा नेते विराज देशमुख, सखाराम क्षीरसागर, कुश भांगे पाटील, संतोष पवार, आनंद वैद्य, रुपेश देशमुख, शैलेश लोमटे, संदीप पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.