esakal | अर्धापूर तालुक्यातील निमगावच्या गरीब शेतकऱ्याच्या मुलीच्या लग्नाला मदत- पत्रकार संघाचा पुढाकार

बोलून बातमी शोधा

पत्रकार संघाकडून मदत
अर्धापूर तालुक्यातील निमगावच्या गरीब मुलीच्या लग्नाला मदत- पत्रकार संघाचा पुढाकार
sakal_logo
By
लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : तालुक्यातील निमगाव येथे राहात असलेल्या अल्पभूधारक निराधार शेतकरी महिलेच्या मुलीच्या विवाहासाठी पत्रकार संघाच्या पुढाकारातून कपाट, काॅट भेट देऊन आदर्श निर्माण केला आहे. कोरोनाच्या काळात अनेक समाजसेवक गरीबांच्या मदतीला पुढे येत असतानाचा अर्धापूर पत्रकार संघही मागे राहिला नाही.

मराठी पत्रकार संघाचे अर्धापूर तालुकाध्यक्ष फिरदोस हुसेनी यांच्याकडून रमजान ईद निमित्त कपडे व साहित्य खरेदी दिला फाटा देत निराधार कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी काॅट व कपाट भेट देऊन मदत दिल्याने अनेकांनी त्यांच्या या निर्णयांचे स्वागत केले आहे. अल्पभूधारक निराधार शेतकरी कुटुंबात अंकिताच्या लग्नास मदत दिली.

अर्धापूर तालुक्यातील निमगाव येथील सुनिता व्यंकटी खटके यांच्या पतीचे आजारपणामुळे गेल्या आठ वर्षापूर्वी निधन झाले. पतीच्या निधनानंतर दोन मुली व एक मुलगा अश्या कुटूंबाचा भार श्रीमती सुनीता यांच्यावर आला त्या दररोज रोज मजुरी करुन कुटुंबाचा घरखर्च चालवत व मुलगी अंकिताच्या लग्नासाठी बचत केलेल्या पैशांमध्ये लग्नासाठी लागणारे साहित्य साड्या, भांडे, सोनं इतर साहित्य खरेदी करुन ठेवले होते. ता. २६ नोव्हेंबरच्या रात्री अचानक आग लागल्याने घरातील कपडे, धान्य व इतर साहित्य जाळल्याने मोठे नुकसान झाले होते.

वडिलांचे छत्र हरवलेल्या व आर्थिक परिस्थितीने खचलेल्या एका निराधार शेतकरी कन्येच्या विवाहास कपाट व काॅट भेट देत सामाजिक बांधिलकी जोपासत खऱ्या अर्थाने गरजवंतास मदत देत माणुसकीचे दर्शन झाले. ता. ३० एप्रिल रोजी अंकिताचा विवाह आहे. यासाठी आणखी दानशूर व्यक्तीने समोर येण्याची गरज आहे.

अंकिताच्या विवाह कार्यास मदत करुन त्यांच्या कुटुंबातील परिस्थिती दूर करण्याचा व दुःख वाटून घेण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे अशी प्रतिक्रिया मराठी पत्रकार संघ आर्धापूर तालुकाध्यक्ष फिरदोस हुसेनी यांनी दिली. यावेळी पञकार ओमप्रकाश पञे, निळकंठ मदने, सखाराम क्षिरसागर, गोवींद टेकाळे, अजीत गट्टानी, राजेश्वर देशमुख, आनंद मोरे, सावरगांवचे ग्रा. म. सदस्य छगन पाटील सांगोळे यांच्या सह समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.

संपादन- प्रल्हाद कांबळे