साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्नाने सन्मानित करा- अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलन

file photo
file photo

नांदेड : मराठी साहित्यामध्ये आजपर्यंत जेवढे साहित्यिक होऊन गेलेले आहेत. अशा साहित्यिकांपैकी अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लिखीत वाङ्‌मयाद्वारे मराठी साहित्यविश्व समृद्ध करण्याबरोबरच साहित्यक्षेत्रामध्ये भारतदेशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचविण्याचे काम केले.अशा जागतिक कीर्तीचे थोर साहित्यिक, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची ता. एक ऑगस्ट रोजी सांगता होत आहे. हे औचित्य साधून अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलनाच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे. 

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या अधिपत्याखालील मोठ्या उदात्त सामाजिक हेतूने बार्टी या स्वायत्त संस्थेची निर्मिती करण्यात आली. परंतु त्या सामाजिक उदात्त हेतूनाच हरताळ फासत तिलांजली दिली. बार्टीमार्फत आयोजित एम.पी.एस.सी./यू.पी.एस.सी. सपर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी विद्यार्थी निवड, प्रशिक्षण केंद्र चालविणेसाठी खाजगी संस्थेची निवड करणे किंवा बार्टीमार्फत समतादूताची निवड करणे या व इतर बार्टीच्या उपक्रमाचा लाभ हा अनुसूचित जातीतील सक्षम अशा विशिष्ट घटकांनाच मिळवून देऊन, अनुसूचित जातीतील मागास, वंचित अशा ५८ जाती या बार्टीच्या उपक्रमाच्या लाभापासून वंचित राहिल्या आहेत.

बार्टीप्रमाणेच आर्टीची स्थापन करा

अनुसूचित प्रवर्गातील वंचित जातींचा सर्वांगीन विकास व्हावा, या दुर्लक्षित जातीही विशेष त्या विकासासाठी व उत्थानासाठी आणि एकंदर या जातीसमूहदेखील विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी आणि सर्व पात्र मुलामुलींना प्रशिक्षित करून सक्षम बनवून पर्याप्त संधी मिळावी, यासाठी या मागास घटकासाठी काम करणारी स्वतंत्र स्वायत्त संस्था म्हणजे अनुसूचित जातीतील मागास, वंचित अशा ५८जातीकरिता संशोधन व प्रशिक्षणाचे काम होणेसाठी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) ची स्थापना करावी. राज्य शासनाने केंद्राकडे राज्यातील शेकडो लोकप्रतिनिधी, आमदार/खासदार, मंत्री, माजी मंत्री, विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी शिफारस केलेल्या लेखी पत्रांची दखल घेऊन, महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाकडे शिफारस करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचेकडे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सतीश कावडे व प्रदेशाध्यक्ष उत्तम बाबळे यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने बुधवारी (ता. २९) जिल्हाधिकारी यांचेमार्फत करण्यात आली आहे.

यांची होती शिष्टमंडळात उपस्थिती

शिष्टमंडळात आंदोलनाचे सतीश कावडे, उत्तम बाबळे,अॅड. बी. एम. गायकवाड, परमेश्वर बंडेवार, दयानंद बसवंते, बालाजी गऊळकर, माणिक कांबळे, सुरेश कांबळे, विठ्ठल घाटे, गोपाळ वाघमारे, सर्जेराव वाघमारे, नागेश तादलापूरकर, सचिन गाडे, आनंद वंजारे, पांडुरंग सूर्यवंशी, गौतम वाघमारे, विक्रम वाघमारे, आकाश बुरूडे, बालाजी इरेवाड, संजय गायकवाड, गौतम शिरसाठ, शिवाजी नुरुंदे, मारोजी शिकारे, प्रदीप घाटे, पांडुरंग ढोके, व्यंकट सूर्यवंशी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com