नांदेडमध्ये घरकुलाच्या कामांना गती, तीन टप्प्यात आखणी

नांदेड महापालिका
नांदेड महापालिकासकाळ

नांदेड : पंतप्रधान घरकुल योजनेच्या (PM Awas Yojana) कामाला नांदेडमध्ये (Nanded) गती आली असून महापालिकेच्या वतीने सध्या चार हजार आठशे घरकुलांची कामे सुरू करण्यात आली आहेत. त्यापैकी दोन हजार २७४ घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत. एकूण नऊ हजार ३५० घरकुलांना मंजुरी मिळाली असून टप्प्याटप्प्याने ही कामेही सुरू करण्यात येणार आहेत. पंतप्रधान घरकुल योजनेच्या अनुषंगाने महापालिका (Nanded Municipal Corporation) आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी नुकताच आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब मनोहरे, शहर अभियंता माधव बाशेट्टी, उपअभियंता प्रकाश कांबळे, तांत्रिक कक्षाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता प्रकाशराव कांबळे, कनिष्ठ अभियंता श्री. ठाणेकर, श्री. जोंधळे, श्री. दंडेवाड, सामाजिक विकास तज्ज्ञ पल्लवी बेहरे, संगणक अभियंता अशरार खान, लेखा विभागाचे संजय कुलकर्णी, सौ. मुंडे तसेच सल्लागार एजन्सी नवनिर्माण महिला बहुउद्देशीय संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते. महापालिकेच्या वतीने पंतप्रधान घरकुल योजना २०१८ पासून राबविण्यात येत आहे.(housing project work in progress under nanded municipal corporation glp88)

नांदेड महापालिका
पंधरा हजारांची लाच घेतल्याप्रकरणी वनरक्षक एसबीच्या जाळ्यात

सुरवातीला महापालिका हद्दीत ज्यांचा प्लॉट किंवा कच्चे घर आहे अशांचे अर्ज मागविण्यात आले. त्याची पाहणी करून पात्र लाभार्थी ठरविण्यात आले आणि त्यानुसार शासनाकडे आत्तापर्यंत १३ सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) पाठविण्यात आल्याची माहिती उपअभियंता प्रकाश कांबळे यांनी दिली. पंतप्रधान घरकुल योजनेतंर्गत आत्तापर्यंत नऊ हजार ३५० घरकुले मंजुर झाली आहेत. त्यापैकी चार हजार आठशे घरकुलांची कामे सुरू झाली आहेत. त्यामध्ये आत्तापर्यंत दोन हजार २७४ घरकुले पूर्ण झाली आहेत. पहिल्या टप्यात एक हजार २६७, दुसऱ्या टप्यात ४०४ तर तिसऱ्या टप्यात ८५५ घरकुलांचे बांधकाम सुरू आहे. लाभार्थ्यांना घरकुलासाठी अडीच लाख रुपये अनुदान देण्यात येत असून त्याचे तीन टप्पे करण्यात आले आहेत. त्यानुसार सुरवातीला एक, नंतर एक लाख आणि शेवटी ५० हजार रुपये देण्यात येत आहेत. त्यानुसार लाभार्थ्यांनी घरकुले बांधायची आहेत.

नांदेड महापालिका
कन्नड तालुक्यात घराची भिंत अंगावर पडून दोघांचा मृत्यू

पंतप्रधान घरकुल योजना ही केंद्र सरकारची असून त्यात एका घरकुलासाठी केंद्र सरकार दीड लाख रुपये तर राज्य सरकार एक लाख रुपये अनुदान देत आहे. या योजनेला ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदत आहे. महापालिकेतर्फे आणखी दोन हजारहून अधिक घरकुलांचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असून तोही लवकरच शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.

- प्रकाश कांबळे, उपअभियंता, नांदेड वाघाळा महापालिका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com