esakal | तळहातावरचे पोट भरायचे कसे, वेठ बिगारी कामगाराचा संतप्त सवाल 
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded Photo

शहरात सहाय्यक जिल्हा कामगार कार्यालय आहे. परंतु या कार्यालयाडे गवंडी आणि घरेलु कामगार महिला यांचीच नोंद केली जाते. त्यामुळे शासनाच्या ज्या काही लाभाच्या योजना येतात त्याचा गवंडी व घरेलु कामगार यांना लाभ मिळतो. रोजंदारीवर काम करणारे विठ बिगारी कामगारांची शासन दरबारी कुठेही नोंद नाही

तळहातावरचे पोट भरायचे कसे, वेठ बिगारी कामगाराचा संतप्त सवाल 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - कोरोना आला, लॉकडाउन झाले आणि लॉकडाउम मध्ये आमचे संसार उघड्यावर आले ते कुणालाही कसे दिसले नाही. लॉकडाउन संपल्याने गाड्या मोटरा सुरुझाल्याने पुन्हा कामाच्या शोधात नांदेड शहराकडे धाव घेणाऱ्या शेकडो मजुरांच्या हाताला आजही काम मिळत नाही. त्यामुळे आल्यापावलांनी त्यांना घरी परतावे लागत आहे. त्यामुळे तळहातावरचे पोट भरायचे कसे याची मजुरांना चिंता लागली आहे. 

शहरात सहाय्यक जिल्हा कामगार कार्यालय आहे. परंतु या कार्यालयाडे गवंडी आणि घरेलु कामगार महिला यांचीच नोंद केली जाते. त्यामुळे शासनाच्या ज्या काही लाभाच्या योजना येतात त्याचा गवंडी व घरेलु कामगार यांना लाभ मिळतो. रोजंदारीवर काम करणारे विठ बिगारी कामगारांची शासन दरबारी कुठेही नोंद नाही. त्यामुळे त्यांनी काम केलेतरच त्याचा दाम मिळतो. परंतु सध्या स्थितीत शहरातील बहुतेक बांधकाम, खोदकाम, घरबदलणे अशी अनेक कामे तात्पूर्ती बंदच ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येतो. त्यामुळे दिवसभर नाक्यावर थांबुन देखील अनेकांच्या हाताला कवडीचे ही काम मिळणे दुरापास्त झाले आहे. 

हेही वाचा- ट्रॅफिक पोलिसांची अशीही संवेदनशीलता

शेकडो कामगार कामाच्या शोधात 

नांदेड शहरात बांधकाम, कापडबाजार, खानावळी, मार्केट कमेटी, मेडीकल तसेच लघु व मध्यस्वरुपाचे घरगुती व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरु असतात. त्यासाठी रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांची मोठी गरज भासते. शहरातापासून २५ ते ३० किलो मिटर अंतरावरील अनेक कामगार कामासाठी रोज शहरात येऊन जुना मोंढा, हिंगोली गेट, हिंगोली नाका, अण्णा भाऊ साठे चौक, नवीन मोंढा, तरोडानाका, छत्रपतीचौत येथे रोज शेकडो कामगार कामाच्या शोधात थांबलेले असतात. मात्र लॉकडाउनपासून यातील चार दोन कामगारांच्याच हताला काम लागते. इतरांना मात्र दिवसर थांबुन देखील काम न मिळाल्याने रिकाम्या हातानी घरी परतावे लागत असल्याची व्यथा इथल्या कामगारांकडून ऐकायला मिळाली. 

हेही वाचा- धक्कादायक : नांदेड जिल्ह्यातील ‘हा’ पाझर तलाव फुटून शेकडो हेक्टर शेती गेली खरडून

लॉकडाउन संपले तरी हाताला काम नाही 
लॉकडाउनमध्ये घरात खाण्यापिण्याचे खुपच हाल झाले. घराबाहेर नियमांच्या विरोधात होते. त्यामुळे खुप वाईट दिवसाचा सामना करावा लागत होता. मात्र जेव्हा काहीच पर्याय नव्हता तेव्हा कामासाठी घराबाहेर पडण्याशिवाय दुसरा गस्ता नव्हता तेव्हा नेहमीच्या जागी न थांबत व गर्दी न करता दुर-दूर अंतरावर कॅनॉललोडवरील बंद दुकामनासमोर येऊन बसत होतो. कधी काम लागायचे कधी नाही. आता लॉकडाउन संपले तरी, हाताला हवे तस काम मिळत नाही. 
-नामदेव सोनटक्के (कामगार)

loading image