Video - निम्म्या पगारात कसा करावा उदरनिर्वाह?, कोण म्हणतं? ते वाचाच

सकाळ वृत्तसेवा | Tuesday, 7 July 2020

शासनाच्या आदेशांची संपूर्ण अंमलबजावणी आम्ही करत आहोत. कोरोनाच्या काळातही जीवाची जोखीम पत्करून सेवा दिली.

नांदेड : एसटी कर्मचाऱ्यांना ५० टक्केच वेतन देण्याचा निर्णय महामंडळाने घेतल्याने कामगारांचा संताप अनावर झाला आहे. आधीच तुटपुंजे वेतन, त्यातही निम्माच हाती पडल्यास उदरनिर्वाह करणे शक्‍य नाही, अशात आम्ही आत्महत्या करावी काय? असा संतप्त सवाल एसटी कर्मचारी उपस्थित करत आहेत. 

कोरोना विषाणूची मालिका खंडित करण्यासाठी देश लॉकडाउन करण्यात आला. या पार्श्‍वभूमीवर २३ मार्चपासून एसटीसेवा बंद करण्यात आली. सुमारे दोन महिने एसटी बंद राहिल्यानंतर शासनाच्या आदेशानुसार, जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू करण्यात आली आहे. पण, त्यालाही प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद नाही. परिणामी कर्मचाऱ्यांचे वेतन, डिझेलवर होणारा खर्च भागवणे कठीण झाले आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांना मे महिन्यात अर्धेच वेतन देण्याचे नियोजन केले आहे. 

हेही वाचा - कोरोना@४४० ः नांदेडला आज पुन्हा तीन पॉझिटिव्ह -

विशेष म्हणजे शासनाच्या आदेशांची संपूर्ण अंमलबजावणी आम्ही करत आहोत. कोरोनाच्या काळातही जीवाची जोखीम पत्करून सेवा दिली. त्यापोटी शासनाने विशेष प्रोत्साहन भत्ता देऊ केला होता. भत्त्याची रक्कम मिळालीच नाही. पण, आता वेतनच अर्धे देण्याचा निर्णय म्हणजेच जगणे नाकारण्याचाच प्रकार असल्याची कर्मचाऱ्यांची भावना वाहक आर. एस. लोखंडे यांनी व्यक्त केली. 
 
खासगी कंपन्यांचे हित जपण्याचा प्रयत्न 
शासनाने सवलत मूल्याच्या प्रतिपूर्तीचा प्रस्ताव मान्य करीत २७० कोटी विभागाकडे जमा केले आहेत. त्यातून कर्मचाऱ्यांना वेतन दिले जाऊ शकते. पण, ते टाळून प्रशासनाने खासगी शिवशाही चालक व खासगी कंपन्यांच्या देय रकमेचा तपशिल मागविला आहे. त्यांच्या देयकाच्या पूर्तीसाठी कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीचा निर्णय घेतलेला असू शकतो, अशी शंका देखील कर्मचाऱ्यांनी उपस्थित केली आहे. 
 
येथे क्लिक कराच - Video - सिडकोतील नागरिकांच्या मरणयातना संपेनात, काय आहे कारण?

कर्मचाऱ्यांचा काय दोष 
शासनाच्या आदेशाचे एसटी कर्मचारी तंतोतंत पालन करीत आहेत. त्यानंतरही उत्पन्न मिळत नसेल, तर यात कर्मचाऱ्यांचा काय दोष आहे. अर्धाच पगार दिला जात असेल, घरखर्च कसा भागवावा, हा प्रश्‍नच आहे. 
- आर. एस. लोखंडे, वाहक (नांदेड आगार)