नांदेड : जिल्ह्याचा ९३.७६ टक्के निकाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

HSC exam 2022 nanded District 93.76 percent result

नांदेड : जिल्ह्याचा ९३.७६ टक्के निकाल

नांदेड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी आॅनलाइन जाहीर करण्यात आला. यामध्ये बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांचा जिल्ह्यातील एकूण निकाल ९३.७६ टक्के इतका लागला असून, यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे.

यंदा नांदेड जिल्ह्यातून ३९ हजार ५३५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यामध्ये २२ हजार १७३ मुले तर १७ हजार २५२ मुली होत्या. प्रत्यक्षात २२ हजार ०२५ मुले तर १७ हजार १० मुली असे एकूण ३९ हजार ३५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी २० हजार ३३५ मुले तर १६ हजार २६८ मुली असे एकूण ३६ हजार ६०३ विद्यार्थी जिल्ह्यात उत्तीर्ण झाले आहेत.

शाखानिहाय निकाल

कला शाखेसाठी १७ हजार २३१, विज्ञान शाखेसाठी १७ हजार ८३७, वाणिज्य शाखेसाठी तीन हजार ५८३ तर व्होकेशनलसाठी ८८४ असे एकूण ३९ हजार ५३५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १६ हजार ९१६ (कला), १७ हजार ७०७ (विज्ञान), तीन हजार ५४८ (वाणिज्य) आणि ८६४ (व्होकेशनल) असे एकूण ३९ हजार ०३५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यात कला शाखेचे १५ हजार २५६, विज्ञान शाखेचे १७ हजार २८९, वाणिज्य शाखेचे तीन हजार ३५४ आणि व्होकेशनलमध्ये ७०४ असे एकूण ३६ हजार ६०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

Web Title: Hsc Exam 2022 Nanded District 9376 Percent Result

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top