नांदेडच्या पहिल्याच पतंग महोत्सवाला प्रचंड प्रतिसाद

file photo
file photo

नांदेड : लॉयन्स परिवारातर्फे नांदेड येथे पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या पतंग महोत्सवाला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून नवा मोंढा मैदानाच्या आसमंतात सर्वत्र रंगीबेरंगी पतंग उडत असल्याचे नयनमनोहर दृश्य पाहण्यासाठी नांदेडकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

माजी मंत्री लॉ . डी. पी. सावंत कार्यक्रमाचे अध्यक्ष होते तर ओमप्रकाश पोकर्णा यांच्या हस्ते पतंग उडवून उद्घाटन करण्यात आले. यावेळी लॉ. अनिल तोष्णीवाल, नवल पोकर्णा, विजय गंभीरे, अशोक पाटील धनेगावकर, राज यादव, संदीप माईंड यांची प्रमुख उपस्थिती होती. संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी पतंग महोत्सव घेण्यामागची भूमिका व स्पर्धेचे नियम आपल्या प्रास्ताविकातून स्पष्ट केले. लॉयन्स क्लब नांदेड मिड टाउनचे अध्यक्ष लॉ.जुगलकिशोर अग्रवाल लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रलचे अध्यक्ष लॉ. संजय अग्रवाल, प्रोजेक्ट चेअरमन लॉ. शिरीष कासलीवाल, कोषाध्यक्ष लॉ. शिरीष गित्ते आणि लॉ. सुनिल साबू यांनी प्रमुख अतिथींचे मोत्यांच्या माळा टाकून स्वागत केले. 

स्पर्धेमध्ये १३७ स्पर्धकांनी सहभाग घेतला. पुरुषांच्या गटात मनीष माखन सुशील महिंद्रकर ओम प्रकाश कोंडावार यांनी अनुक्रमे तीन पारितोषिके पटकावली. गायत्री गरुडकर, ईश्वरी गरुडकर शततारका पांढरे या तिघीजणी मुली व महिलांच्या गटात सरस ठरल्या. तरुण गटात शोएब शेखने प्रथम, शुभम ठाकुरने द्वितीय तसेच आनंद गटलेवार याने तृतीय क्रमांक पटकावला. मुलांमध्ये  चंद्रकेश ठाकूर पहिला, आदिराज पाटे दुसरा तर  मोहम्मद उसेद तिसरा आला. प्रत्येक गटातील विजेत्यांना एक हजार, सहाशे आणि चारशे रुपयाचे रोख पारितोषिके देण्यात आली. सर्व विजेत्यांमध्ये झालेल्या लक्षवेधक लढतीमध्ये लॉ. मनीष माकन यांनी विजय मिळवून कै.गणपतराव मोरगे यांच्या स्मरणात ठेवण्यात आलेले रुपये तीन हजार  चे रोख बक्षीस व सर्वोत्कृष्ट पतंगबाज हा किताब पटकावला. 

विजेत्यांना लॉ. जयेश ठक्कर, लॉ. प्रविण अग्रवाल , लॉ. योगेश जैस्वाल, लॉ. सतिष सामते , लॉ. रवी कासलीवाल, लॉ. धनंजय डोईफोडे, लॉ. नरेश व्होरा,लॉ. ओमप्रकाश मानधने, लॉ. डॉ. विवेक मोतेवार यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. 
स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून लॉ. शिरीष कासलीवाल यांनी काम पाहिले. प्रा. रवि श्यामराज, लॉ. आनंदीदास देशमुख, लॉ. गौरव भारतीया, लॉ. प्रेम फेरवानी, लॉ. महेश चांडक यांनी वेगवेगळ्या लढतीत पंच म्हणून चोख भूमिका बजावल्यामुळे कोणताही वाद झाला नाही. काटा- काटीमध्ये कटलेले पतंग लुटण्यासाठी तरुणांनी मोठी गर्दी केली असली तरी चायना मांजा व नायलॉन मांजाला बंदी घातल्यामुळे कोणतीही दुर्घटना घडली नाही. पतंग महोत्सव यशस्वी करण्यासाठी लॉ. रमेश मिरजकर, लॉ. सुबोध जैन, लॉ. अशोक कासलीवाल, लॉ. विजय घई, लॉ. तेजस मोदी, लॉ. अमरजीतसिंघ जहागीरदार, उंटवाले, लॉ. आशा अग्रवाल, लॉ. छाया कासलीवाल, लॉ. संगीता मोदी, लॉ. तारा कासलीवाल, लॉ. मिली मोदी, राजेश यादव, धीरज यादव, संतोष भारती
यांनी परिश्रम घेतले. यावर्षी मिळालेल्या प्रतिसादामुळे दरवर्षी पतंग महोत्सव घेण्याचा निर्धार लॉयन्स परिवाराने केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com