इंटरनेटच नाही तर मग धडे कसे गिरवणार...?- ग्रामिण विद्यार्थी व पालकांचा प्रश्न 

file photo
file photo

नांदेड : कोरोना संसर्गामुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. त्यातच लाॅकडाउन व संचारबंदी यामुळे जिल्ह्यातील सर्व व्यवहार ठप्प आहेत. अत्यावश्यक सेवेा वगळता सर्व लाॅकडाउनमध्ये येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यातच शिक्षण विभागाचा गोंधळ व त्यातून विद्यार्थी व पालकांना होणारा मनस्ताप तो वेगळाच. सध्या ऑनलाईन शिक्षणाचा बोलबाला झालाय. मात्र, ग्रामीण भागात इंटरनेटच उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्याचे मोठे हाल होतायेत.अनेक विद्यार्थ्यांना नेटवर्कसाठी जीवघेण्या कसरती कराव्या लागत आहेत. जिल्ह्यातील अनेक वाडी- तांड्यावर कुठल्याही नेटवर्कची सेवा नीट चालत नाही. अशात आम्ही शिक्षण कसे घ्यायचे असा प्रश्न ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पडला आहे. गावात इंटरनेटच नाही... तर ऑनलाईन शिक्षणाचे धडे कसे गिरवायचे!

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले. त्याचा फटका सर्वानांच बसला. त्यापासून शिक्षणक्षेत्र देखील सुटलं नाही. जुलै महिना शेवटच्या टप्प्यात आहे तरी देखील शाळा सुरु झाल्या नाहीत. शाळा कधी सुरु होतील याबद्दल शिक्षण विभाग देखील संभ्रमावस्थेत आहे. त्यामुळं शिक्षण विभागाने ऑनलाईन शिक्षण देण्याचे निर्देश दिले आहेत. अनेक खासगी शिकवण्या आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी ऑनलाईन शिक्षणाकडे कल दिला आहे. ग्रामीण भागात इंटरनेटच्या सुविधा नसल्यामुळं विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांना नेटवर्कसाठी मोठ्या कसरती कराव्या लागत आहेत. त्यासाठी विद्यार्थी झाडावर तर कोणी घराच्या छतावर इंटरनेट शेधताना दिसत आहेत. जिथे नेटवर्क मिळेल तिथून विद्यार्थी कसाबसा अभ्यास करत आहे..

ऑनलाईन शिक्षणासाठी लागणारा खर्च देखील परवडणारा नाही

विद्यार्थ्याची ऑनलाईन शिक्षणाची ही कसरत जीवावर बेतणारी इतकी अवघड बनलीय. मात्र, स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी विद्यार्थीही कसरत करतायेत. ग्रामीण भागातील शेतकरी आणि मजूरवर्गाला ऑनलाईन शिक्षणासाठी लागणारा खर्च देखील परवडणारा नाही. मोबाईल आणि रिचार्जसाठी दर महिन्याला लागणारा खर्च मोठा आहे. अशा परिस्थितीत देखील सरकारने आधी इंटरनेटची जोडणी करावी, त्यानंतरच ऑनलाईन शिक्षणाची सक्ती करावी, अशी मागणी विद्यार्थी आणि पालक करत आहे.

ग्रामिण भागात इंटरनेटची सुविधाच नाही

शिक्षणाने मस्तक सशक्त होते. असे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगुन गेले आहेत. सध्या कोरोनाची सात सर्वत्र परसल्याने या जीवघेण्या आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. विद्यार्थ्याना शिक्षण मिळावे यासाठी राज्याचे शिक्षण विभाग नवनविन शक्कल काढून विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घेत असला तरी विद्यार्थ्यापर्यंत पोहचण्याचा एकमेव मार्ग म्हणजे इंटरनेटद्वारे शिकलणी. मात्र ग्रामिण भागात ही सुविधाच नसल्याने विद्यार्थींनी शिक्षणाचे धडे कसे गिरवायचे असा प्रश्न उपस्थित होत आहे.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com