रब्बी पिकासाठी पीकविमा योजना लागू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रब्बी पिकासाठी पीकविमा योजना लागू

नांदेड : रब्बी पिकासाठी पीकविमा योजना लागू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : पंतप्रधान पिक विमा योजना रब्बी हंगाम २०२१-२२ मध्ये राबविण्यात येणार आहे. विमा योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. या योजनेअंतर्गत वास्तवदर्शी विमा हप्ता आकारण्यात येणार असुन, रब्बी हंगामातील पिकांसाठी दिड टक्के असा मर्यादीत आहे. जिल्ह्यातील गहु (बागायती), ज्वारी (जिरायती), हरभरा या पिकांसाठी ही योजना लागू आहे.

या योजनेअंतर्गत गहु (बागायती) या पिकासाठी पिक विमा संरक्षित रक्कम हेक्टरी ३८ हजार रुपये. शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता हेक्टरी ५७० रुपये आहे. विमा लागू असलेले तालुके नांदेड, अर्धापुर, मुदखेड, बिलोली, लोहा, कंधार, नायगाव, धर्माबाद, किनवट, हिमायतनगर, भोकर, हे हदगाव आहेत. पिक विमा ऑनलाइन भरण्याची अंतिम तारीख १५ डिसेंबर राहिल.

हेही वाचा: नागपूर : अजनीची प्रस्तावित जमीन वनासाठी संरक्षित नाही

ज्वारी (जिरायती) या पिकासाठी पिक विमा संरक्षित रक्कम हेक्टरी २८ हजार रुपये. शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता हेक्टरी ४२० रुपये आहे. विमा लागु असलेले तालुके नांदेड, देगलूर, नायगाव, बिलोली, मुखेड, धर्माबाद, किनवट, हदगाव हे आहेत. पिक विमा ऑनलाइन करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर आहे.

हरभरा या पिकासाठी पिक विमा संरक्षित रक्कम हेक्टरी ३५ हजार रुपये. शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता रुपये हेक्टरी ५२५ रुपये आहे. विमा लागु असलेले तालुके नांदेड, अर्धापूर, मुदखेड, बिलोली, लोहा, कंधार, देगलूर, नायगाव, धर्माबाद, मुखेड, किनवट, माहूर, हिमायतनगर, भोकर, हदगाव, उमरी ही आहेत. पिक विमा ऑनलाईन करण्याची अंतिम तारीख १५ डिसेंबर राहिल.

"ही योजना इफको टोकीयो जनरल इंन्शुरन्स कंपनीमार्फत राबविण्यात येणार आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पिक विमा उतरवण्याची अंतिम तारीख या ज्वारी जि. पिकासाठी ता. ३० नोव्हेंबर असून गहु बा. व हरभरा पिकासाठी १५ डिसेंबर ही आहे. अधिकच्या माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या तालुका कृषि अधिकारी किंवा जवळच्या बँकेशी संपर्क साधावा."

- रविशंकर चलवदे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी.

loading image
go to top