esakal | मसुरी येथील प्रशिक्षणामध्ये नांदेडच्या ‘सीईओं’ची छाप

बोलून बातमी शोधा

वर्षा ठाकूर
मसुरी येथील प्रशिक्षणामध्ये नांदेडच्या ‘सीईओं’ची छाप
sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड ः जीद्द, मेहनत आणि सतत सकारात्मक विचारसरणी असेलतर ध्येय गाठणे काहीच अवघड नसते. हेच नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) वर्षा ठाकूर- घुगे यांनी दाखवून दिले आहे. सनदी अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाल्यानंतर त्या प्रथमच मसुरी येथील ‘एलबीएसएएनए’च्या प्रशिक्षणाला गेल्या आहेत. तेथे त्यांनी सादर केलेल्या शोध प्रबंधाला प्रथम तर सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल तृतीय क्रमांकाचा पुरस्कार पटकावला आहे.

वर्षा ठाकूर-घुगे या एक महिन्याच्या प्रशिक्षणासाठी दोन एप्रिल रोजी मसुरी येथे प्रशिक्षणासाठी गेल्या आहेत. या प्रशिक्षणाला भारतातून ७० सनदी अधिकारी सहभागी झालेले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील १० अधिकारी असून मराठवाड्यातील वर्षा ठाकूर या एकमेव अधिकारी आहेत. प्रशिक्षणामध्ये वर्षा ठाकूर यांनी ‘‘बालकामगार प्रकल्पातील माझे हस्तक्षेप’’ हा शोधनिबंध सादर केला. त्याला प्रथम पुरस्कार मिळाला. शिवाय सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दलही तिसरा क्रमांक मिळाला आहे.

हेही वाचा - एकीकडे ऑक्सिजनसाठी हतबल झालेला माणूसच करतोय झाडांची कत्तल; झाडे लावा, झाडे जगवाला खीळ

सप्टेंबर २०२० मध्ये भारतीय प्रशासन सेवेमध्ये वर्षा ठाकूर यांना पदोन्नती मिळाली. या नियुक्तीनंतर त्यांची पहिल्यांदाच नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून २४ सप्टेंबर २०२० रोजी निवड झाली होती. २८ सप्टेंबर रोजी त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. पदोन्नतीपूर्वी वर्षा ठाकूर या औरंगाबाद येथे सामान्य प्रशासन विभागात वर्षा ठाकूर या उपायुक्त म्हणून काम करत होत्या. त्यांनी उपविभागीय अधिकारी म्हणून सिल्लोड, पैठण, कन्नड येथे काम केले. त्यांच्या उत्कृष्ट कामाची दखल घेवून, प्रशासनातील त्यांचा अनुभव लक्षात घेवून त्यांना भारतीय प्रशासन सेवेमध्ये पदोन्नती मिळाली.

प्रशिक्षणामुळे आत्मविश्वास वाढला

पदोन्नती मिळाल्यापासूनच मी प्रशिक्षणाची अपेक्षा करत होते. प्रशिक्षणामध्ये मला खूप काही शिकायला भेटले. प्रेरणा मिळाली. स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली. एकंदरीतच आत्मविश्वास वाढला आहे.

- वर्षा ठाकूर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड.

संपादन- प्रल्हाद कांबळे