रविवारी नांदेडकरांना दिलासा

शिवचरण वावळे
Sunday, 23 August 2020


जिल्ह्यातील १६८ कोरोनाबाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर आरटीपीसीआर तपासणीद्वारे ३२ तर किट्स तपासणीद्वारे ५७ असे एकूण ८९ व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. 

नांदेड ः कोरोना अहवालानुसार रविवार (ता.२३) जिल्ह्यातील १६८ कोरोनाबाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर आरटीपीसीआर तपासणीद्वारे ३२ तर किट्स तपासणीद्वारे ५७ असे एकूण ८९ व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. तर दिवसभरात सहा रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले.

 

हेही वाचा -  पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या गडाला धक्का, मुदखेड पंचायत समितीचे सभापती वंचितच्या गळाला

एकूण बाधितांची संख्या आता पाच हजार
रविवारी एकूण ४५२ अहवालापैकी ३५१ निगेटिव्ह तर ८९ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता पाच हजार ३२ एवढी झाली असून, यातील तीन हजार २१५ बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकूण एक हजार ६०१ बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरू असून, यातील ११८ बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.
शनिवारी (ता.२२) ला जिल्ह्यातील माहूर कोविड केअर सेंटर येथील महिला (वय ९०), शासकीय रुग्णालयातील नवी अबादी येथील पुरुष (वय ६२), आंबेडकरनगर सिडको येथील पुरुष (वय ७०), बळीरामपूर नांदेड महिला (वय ४७), रविवारी (ता.२३) जिल्हा रुग्णालय मदिनानगर नांदेड येथील पुरुष (वय ७२), पावडेवाडी नांदेड येथील पुरुष (वय ६३) पुरुष यांचा मृतामध्ये समावेश आहे. आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड १६, पंजाब भवन कोविड केअर सेंटर ११७, जिल्हा रुग्णालय चार, हदगाव कोविड केअर सेंटर सहा, बिलोली कोविड केअर सेंटर एक, खासगी रुग्णालय पाच, अर्धापूर कोविड केअर सेंटर सात, लोहा कोविड केअर सेंटर ११, बारड कोविड केअर सेंटर एक असे एकूण १६८ बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.

आजच्या बाधितांमध्ये 
नांदेड मनपा क्षेत्र - २९, नांदेड ग्रामीण - दोन, अर्धापूर - एक, हदगाव - तीन, देगलूर - एक, किनवट - १२, कंधार - तीन, मुखेड - १६, उमरी - एक, हिंगोली - तीन, हिमायतनगर - एक, भोकर - दोन, माहूर - एक, मुदखेड - चार, नायगाव - एक, धर्माबाद - नऊ असे एकूण ८९ बाधित आढळले. जिल्ह्यात एक हजार ६०१ बाधितांवर औषधोपचार सुरू आहेत.

* कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
* सर्वेक्षण- एक लाख ५१ हजार २४
* घेतलेले स्वॅब- ३४ हजार ६९०
* निगेटिव्ह स्वॅब- २७ हजार ७१९
* रविवारी पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- ८९
* एकूण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- पाच हजार ३२
* रविवारी स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- पाच
* रविवारी स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- पाच
* एकूण मृत्यू संख्या- १८३
* रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- तीन हजार २१५
* रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- एक हजार ६०१
* रविवारी प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- २२९
* गंभीर प्रकृती असलेले बाधित- ११८

संपादन - स्वप्निल गायकवाड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Improvement In 168 Corona Affected Persons In The District, Nanded News