सुबोध काकानींचा पुढाकार : डॉ. विपीन यांच्या हस्ते कार्डियाक रुग्णवाहिकेचे लोकार्पण 

प्रल्हाद कांबळे
Friday, 2 October 2020

धर्माबाद शहरातील स्वर्गीय राजाराम काकांनी यांचा सामाजिक कार्याचा वारसा मोठा असून त्यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांचे नातू तथा उद्योजक सुबोध काकांनी हे सामाजिक कार्यात तन- मन- धनाने नेहमी तत्पर असतात.

नांदेड : जिल्ह्यातील अतिगंभीर रुग्णांच्या सेवेसाठी उद्योजक सुबोध काकांनी यांनी अत्याधुनिक सुविधा असलेली कार्डियाक रुग्णवाहिका खरेदी केली. या रुग्णवाहिकेचे लोकार्पण जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या हस्ते गुरुवारी (ता. एक) जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात केले. 

धर्माबाद शहरातील स्वर्गीय राजाराम काकांनी यांचा सामाजिक कार्याचा वारसा मोठा असून त्यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांचे नातू तथा उद्योजक सुबोध काकांनी हे सामाजिक कार्यात तन- मन- धनाने नेहमी तत्पर असतात. सध्या जिल्ह्यात कोरोनाचा थैमान सुरु आहे. ग्रामिण भागातील रुग्णांना शहरात आणण्यासाठी रुग्णवाहिका कमी आहेत. त्यमुळे अनेक रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. या बाबाचा सारासार विचार करुन धर्माबाद येथील उद्योजक सुबोध काकानी यांनी पुढाकार घेऊन कार्डीयाक रुग्णवहिका नांदेडकरांच्या सेवेत दाखल केली. 

हेही वाचा हिंगोली : उपजिल्हाधिकारी २० तर तहसीलदार संवर्गातील २७ अधिकाऱ्यांच्या बदल्या

रुग्णांच्या सेवेसाठी २२ लाखांची कार्डियाक रुग्णवाहिका

कोरोनाच्या संकटात असलेल्या गोरगरीब जनतेला आजही काकानी अन्नदान करीत आहेत. तसेच धर्माबाद येथील कोविड केअर सेंटरमधील कोरोना रुग्णांना तीन महिन्यापासून सकाळी नाश्ता, दुपारी व संध्याकाळी जेवणाची व्यवस्था त्यांनी केल्यामुळे कोरोना बाधित रुग्णांचे मनोबल वाढले आहे. शेकडो रुग्ण कोरोनावर मात करून घरी सुखरूप परत जावेत. त्यांच्या अनेक सामाजिक कार्याचा लाभ जनतेला मिळत असतानाही उद्योजक सुबोध काकानी यांनी जिल्ह्यातील रुग्णांच्या सेवेसाठी अत्याधुनिक सुविधा असलेली २२ लाखांची कार्डियाक रुग्णवाहिका खरेदी केली आहे. या रुग्णवाहिकेचे लोकार्पण काकानी यांनी गुरुवारी (ता. एक) ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटणकर यांच्या हस्ते केले. विशेष म्हणजे गुरुवारी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांचा वाढदिवस होता.

येथे क्लिक करानांदेड : दाळीचे दर गगणाला, भाजीपाल्याचे दर कडाडले, अनेक भाज्या गायब

यांची होती उपस्थिती

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, उद्योजक सुबोध काकानी, मनोज बुंदेले, मन्मतअप्पा रोषणगावकर यांच्यासह महसूल व आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सदर रुग्णवाहिका ही नांदेड जिल्ह्यातील रुग्णांच्या सेवेसाठी असून फक्त इंधन खर्च व वाहनचालकाचा ठराविक भत्ता या आधारे रुग्णांच्या सेवेत उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांच्या खर्चात मोठी बचत होणार आहे. ही रुग्णवाहिकेत अत्याधुनिक सुविधा आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांसाठी ही रुग्णवाहिका उपयुक्त ठरेल असे उद्योजक सुबोध काकांनी यांनी सांगितले. त्यांच्या या दानशुरपणाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Initiative of Subodh Kakani: Dr. Dedication of Cardiac Ambulance by Vipin nanded news