आमदारांच्या तक्रारीवरुन चौकशी, काय आहे प्रकरण वाचा

प्रभाकर लखपत्रेवार
Friday, 4 September 2020

अप्पर जिल्हाधिकारी, दोन उपजिल्हाधिकारी एक तहसीलदाराच्या पथकाकडून नायगाव तहसील कार्यालयात चौकशी सुरु : आ. राजेश पवार यांची तक्रार

नायगाव (जिल्हा नांदेड ) : नायगावच्या तहसील कार्यालयात गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान अचानक अप्पर जिल्हाधिकारी, दोन उपजिल्हाधिकारी, एक तहसीलदार व एक नायब तहसिलदाराचे पथक धडकले. कार्यालयात येताच त्यांनी एक एक फायलीची कसून तपासणी करण्यास सुरुवात केल्याने अनेकांना घाम फुटत होता. हि तपासणी चालू असतांना दुसरीकडे  तहसीलदार सुरेखा नांदे यांच्यावर कारवाई होणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली. दरम्यान दुपारच्या नंतर तहसील कार्यालयातील अनागोंदी कारभाराबद्दल आ. राजेश पवार यांनी तक्रार केली असल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी सुचनवजा तक्रार केली असल्याच्या वत्ताला त्यांनी दुजोरा दिला आहे.

वसमत येथील निलंबन बहाल झाल्यानंतर तहसीलदार सुरेखा नांदे या ता. १४ आँगष्ट २०१८ रोजी नायगाव येथे रुजू झाल्या. पण त्यांच्या अनागोंदी कारभारामुळे त्या अल्पावधीतच एक वादग्रस्त तहसीलदार म्हणून सुपरिचित झाल्या. तक्रारी असो वा सर्वसामान्यांच्या तक्रारीबाबत त्या नेहमीच सकारात्मक द्रष्टीकोन न ठेवता उध्दट व अरेरावीपणाची भाषा वापर आलेल्या आहेत. त्यांच्या प्रकाराबद्दल अनेकवेळा तत्कालीन जिल्हाधिकारी अरुण डोंगर यांच्याकडे तक्रारी झाल्या पण त्यांनी तहसीलदार नांदे यांना पाठीशी घालण्याचेच काम केले. त्याचबरोबर मेळगाव रेती घाटातील नियमबाह्य रेती उत्खनन प्रकरणीही डोंगरे यांनी मोठा बचाव केला त्यामुळे माझे कुणीच काहीही करु शकत नाही या अविर्भावात तहसीलदार वावरत होत्या. 

हेही वाचा -  नांदेडच्या ‘स्वारातीम’ विद्यापीठात ता. ३० सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन

या प्रकरणी आ. राजेश पवार यांच्याकडेही तक्रारी झाल्या

 या प्रकरणी आ. राजेश पवार यांच्याकडेही तक्रारी झाल्या. त्यांनी याबात तहसीलदारांची प्रत्यक्ष भेट घेवून कानुघाडणी केली सर्वसामान्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवल्या जावेत अशी अपेक्षा व्यक्त करताना शेतकऱ्यांचे निराधारांच्या अडचणी सोडवण्यात हयगय केली तर गाठ माझ्याशी असल्याणीही तंबी दिली होती. पण तहसील कार्यालयाच्या कारभारात कुठलीच सुधारणा झाली नसल्याने या प्रकरणी आ. पवार यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांचेकडे तक्रार करुन आलेल्या तक्रारीची वेळेत दखल घेतल्या जात नाही, तक्रार स्विकारली तर तक्रारदारास पोहोच दिली जात नाही. 

येथे क्लिक करावेशीमधला वाद थेट पोहचला पोलिस ठाण्यात, काय आहे कारण?

जप्त केलेल्या रेती साठ्यातुन अवैध रित्या वाळू वाहतुक होत आहे

तक्रारीवर काय कारवाई झाली याचेही उत्तर दिल्या जात नाही, कामे घेवून कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना व शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक दिल्या जात नाही, तलाठी मुख्यालयी राहत नाहीत बँगमध्ये स्टँप घेवून शहरातच फिरतात, जप्त केलेल्या रेती साठ्यातुन अवैध रित्या वाळू वाहतुक होत आहे, फेरफारसाठी तलाठ्यांचे उबरवठे झिजवावे लागतात, निराधाराचे कामे वेळेवर होत नाहीत, राशन कार्ड वेळेवर मिळत नाही अशा अनेक तक्रारी आल्याने तहसीलमधील कामात सुधारणा करण्याबाबत तक्रारवजा सुचना जिल्हाधिकाऱ्याकडे केली होती.  याप्रकरणी आ. राजेश पवार यांच्याशी संपर्क करुन माहिती घेतली असता केलेल्या तक्रारीबाबत त्यांनी दुजोरा दिला आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inquiry into MLA's complaint, read the case nanded news